
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारसाठी बी. एल. खांडरे सन्मानित…
प्रा. दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी -वर्धा
हिंगणघाट येथील संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट येथे कार्यरत क्रीडा शिक्षक बंडू श्री.लक्ष्मणराव खांडरे यांची किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टिंग क्लब हिंगणघाट यांच्या आयोजित उत्कृष्ट क्रीडाशिक्षक पुरस्कारासाठी निवडून त्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील असणे विविध नवीन उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा विभागीय राज्यस्तरापर्यंत पोहोचविणारा शिक्षक निस्वार्थी मनाने मुलांसाठी झटणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सातत्याने कार्य असणारा असा क्रीडा शिक्षक बंडू लक्ष्मणराव खांडरे यांच्या कामाची दखल घेतल्या गेली त्याआधी सुद्धा त्यांना शाळेतून दोन वेळा संजय भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जिल्हास्तरीय इनर व्हील क्लब हिंगणघाट यांच्याकडून 2022 मध्ये आदर्श शिक्षक म्हणून यांच्याकडून सन्मानित करण्यात आले होते त्यांना सन्मानचिन्ह व शाल देऊन उत्कृष्ट क्रीडाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खांडरे म्हणतात की हा पुरस्कार म्हणजे मला नवीन कार्य करण्यास प्रेरणा देणारी ऊर्जा आहे मी किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टिंग क्लब हिंगणघाट यांचे मनःपूर्वक आभार मानते हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जस्टीस माननीय श्री अरुणजी चौधरी साहेब माननीय आमदार समीर भाऊ कुणावर साहेब माननीय मोहन बाबू अग्रवाल माननीय रोशन पंडित माननीय मारुती मुळूक क्रीडा अधिकारी माननीय अनिल निमगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शाळेतील शिक्षक बंधू व किड्स ब्राईट फीचर क्लबचे फुटबॉल प्रशिक्षक मुस्तफा बकस कबीर बक्स शाळेचे मुख्याध्यापक माननीय राजू जी महाजन पर्यवेक्षक दिलीप मिटकर यांनी मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
Total Users : 10829