ji24news

प्रती-पंढरी श्रीक्षेत्र पारडी येथील संत नगाजी महाराज व गोकुळाष्टमी यात्रा.

: प्रती-पंढरी श्रीक्षेत्र पारडी येथील संत नगाजी महाराज व गोकुळाष्टमी यात्रा.

प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

वर्धा: विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र पारडी (नगाजी) येथे भगवान श्रीकृष्ण जन्मा-प्रित्यर्थ भव्य जत्रेचे स्वरुप श्री कृष्णा जन्मापासून चवथ्या दिवशी पाहावयास मिळते. यावर्षी या योग 9 सप्टेंबर 2023 रोजी आला असून महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून भाविक भक्त भरपावसात भगवान गोपालकृष्ण, संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर व संत नगाजी महाराजाच्या दर्शनासाठी पारडीला येतात व गोपालकल्याचे एक शीत घेवून स्वतःला धन्य करतात.
हिंगनघाट तालुका संताचे माहेरघर आहे. श्री संत नगाजी महाराज, संत नानाजी महाराज, संत भोजाजी महाराज, सदाराम महाराज, श्री नागाबाबा आदि संत या तालुक्यात झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी महाराष्ट्रास सौन्दर्य आणि वैभव प्राप्त करून दिले. व भक्ति मार्गाचे गोड रसायन सामान्य जनापर्यंत पोहचविले. नैराश्य व वैफल्यातून विमोचनाचा मार्ग दाखविला. या वैभवशाली संत परंपरेमध्ये संत नगाजी महाराजाचा समावेश होतो. संतश्रेष्ठ नगाजी महाराजाची किर्ती अगाध आहे. तीनशे वर्षापूर्वी त्यांनी जे तत्वज्ञान सांगितले, जो संदेश दिला त्या तत्वज्ञानावरून नगाजी खरच तत्वबोधी होते. परमेश्वराचे निस्सीम भक्त होते. समाजातील पुढील पिढीला अत्मोन्नतीचा मार्ग दाखविण्यासाठी त्यांनी अभंगवाणी केली. ती निश्चित मार्गदर्शक ठरणारी आहे. देह आहे तोपर्यंत सर्व आहे, बाकी सर्व नाशिवंत आहे. असे महाराजांनी अभंगातून पटवून दिले. विदर्भातील ही संत मंडळी ज्या-ज्या गावी अवतरली, त्या-त्या गावाचा व परिसराचा उद्धार झालेला आहे.
शके 1658 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील विठोबा व रखूमाई नावाचे न्हावी जातीचे जोडपे त्या भागात पडलेल्या दुष्काळामुळे नागपुर प्रांतात उदरनिर्वाह करण्यासाठी मार्गक्रमण करीत मांडव्य ऋषिचा आश्रम असलेल्या पारडी या गावी रात्री मुक्कामी थांबले. पारडीच्या पाटलांनी उभयतांना आश्रय देवून थांबवून घेतले. वना व पोथरा नदी मध्ये वसलेल्या पारडी गावात ते वास्तव्यास होते. या जोडप्याची परमेश्वरावर द्रुढ श्रद्धा होती. विठोबा नित्य सकाळी स्नान करून देवाची प्रार्थना, रात्री हरिपाठ व भजन करीत होते. विठोबाचा न्हाव्याचा व्यवसाय होता, परंतु सोबतच ते एक निष्णात वैद्य होते. हे जोडपे अत्यंत भाविक होते. त्यांच्या कुटुंबात पांडुरंगाची भक्ति व पंढरीची वारी सातत्याने चालायची. परंतु त्यांच्या कुटुंबात एकच कमी होती आणि ती म्हणजे रखूमाईला मुलबाळ नव्हते. विठोबा व रखूमाई या जोडप्याला पारडीस येवून 17 वर्षे झाली असता एके रात्री विठोबाला स्वप्न पडले. स्वप्नात भल्या मोठ्या भुजंगाने (नागाने) दर्शन दिले व म्हंटले की, मी गावाचे उत्तरेकडील वारुळात राहत असून माझ्या डोक्यावर गळू (फोड) झालेला आहे, त्याचा मला फार त्रास आहे. आणि तू वैद्य आहे मला रोगमुक्त कर. विठोबाने स्वप्नातील चर्चा त्याची पत्नी रखुमाई व पाटलाच्या कानावर टाकली. व चर्चे शेवटी परत जर असे स्वप्न आले तर भुजंगा कडे जाण्याचे ठरले. तिसर्‍या दिवशी परत तेच स्वप्न दिसल्याने विठोबा सकाळी भजन पूजनाने गळू (फोड) फोडायला गेले. भुजंगाला आज्ञा करून बाहेर बोलाविले. भला मोठा भुजंग पाहून सोबतची मंडळी पळून गेली. विठोबा मात्र पांडुरंगाचे स्तवन करीत भुजंगावर शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. भुजंगाने विठोबाला वेढून घेतले व डोके मांडीवर ठेवले. विठोबांनी शस्त्रक्रिया करून भुजंगाला तीन दिवसांनी परत येण्याची विनंती केली.
रात्री स्वप्नात पुन्हा भुजंग आले व विठोबास म्हणाले की, विठोबा तो भुजंग म्हणजे दुसरे कोणी नव्हते, मी स्वतः पंढरीचा पांडुरंग तुझी परीक्षा घेण्यासाठी भुजंग झालो. तुझी परमेश्वरावरील द्रुढ भक्ति पाहून मी खुश झालो आहे, मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे. हे ऐकल्यावर या जोडप्यास अत्यानंद झाला.
शके 1676 कार्तिक शुद्द पंचमीला माता रखुमाईचे पोटी पुत्र झाला. हेच ते नगाजी महाराज भगवान विष्णूचा अवतार होय. गोकुळात बाळकृष्णाने ज्या लीला केल्या तश्याच लीला बाळ नगाजी कडून पारडीत पाहावयास मिळाल्या. बालपणापासून धार्मिक वृत्ती, परमेश्वराचे चिंतन, व आई-वडिलांचे संस्कार नगाजीमध्ये दिसू लागले. तरुणावस्थेत अल्लीपूरच्या वेनाबाई सोबत त्यांचा विवाह झाला. संपूर्ण आयुष्य त्यांनी आई-वडिलांची सेवा केली. बिछान्यावर पडलेल्या आई-वडिलांना त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घडविले.आई-वडिलांची पंढरीची वारी नगाजी महाराजांनी पुढे चालविली. चार महीने पंढरी व आळंदीला राहूनच ते यायचे. वडिलांचा पांडुरंगावर अतूट विश्वास होता. म्हणूनच पांडुरंगाला जन्म घेवून समाजाला भक्तीचे धडे द्यायचे होते.
नगाजी महाराजांची म्हातारवयात ही वारी सुरूच होती. त्यांना होणारा त्रास खुद्द पांडुरंगाना होत होता. म्हणून पांडुरंगाने नगाजीस सांगितले की, तू आता पंढरीस येणे नाही, तर मी स्वतः तुझे पारडीला तुझ्या येथील गोकुळ अष्टमी उत्सवामध्ये ज्ञानेश्वर माऊलीसह चार दिवस मुक्कामी राहीन. तुझ्या गावाच्या शेजारी वाहणार्‍या वना, पोथरा नद्या चंद्रभागेसमान असून पारडी पंढरी समान आहे. इथे येणार्‍या प्रत्येक भक्तास पंढरीचे पुण्य लाभेल. महाराजाच्या काळापासून आजही श्रीकृष्ण जन्मापासून येथे उत्सव सुरू होतो. जन्मापासून चवथ्या दिवशी यात्रा, गोपाळकाला, व दही-हंडी होत असते. आजतागायत ही प्रथा अखंड सुरू आहे.माहिती संकलन व लेखन ॲड. सारंग अशोकराव दोड. विश्वस्त.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर