
जिल्हा परिषद शाळा साखरशेत येथे दहीहंडी उत्सव साजरा.
प्रतिनिधी- ji24news दीपक भोये
विक्रमगड
दहीहंडी हा एक उत्साही आणि आनंदी सण आहे जो भगवान कृष्णाचा जन्म साजरा करण्यासाठी केला जातो. हे भक्ती, खेळ आणि मनोरंजन या घटकांना एकत्रित करते, ज्यामुळे हा भारतातील एक अद्वितीय आणि प्रेमळ सांस्कृतिक कार्यक्रम आहे. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.
महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही-लोणी खात असे. त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत. ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते.
‘गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला’ असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. संस्कृतीची मुलांना जान रहावे म्हणूनजिल्हा परिषद शाळा साखरशेत उज्जैनी तालुका वाडा, जिल्हा पालघर उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रामदास खरपडे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर व्यवहारे, शिक्षक दशरथ धुमाळ व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

Total Users : 10828