ji24news

ग्रामपंचायत कार्यालय खुडेद विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शन व जनसंवाद अभियान……


ग्रामपंचायत कार्यालय खुडेद विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शन व जनसंवाद अभियान……

प्रतिनिधी- ji24newsदीपक भोये विक्रमगड
दिनांक 7/9/2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय खुडेद येथे विक्रमगड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी माननीय API रविंद्र पारखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद अभियान कार्यक्रम अंतर्गत सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेत माननीय पारखे साहेबांनी आगामी गणेशोत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी गणेशोत्सवाची जबाबदारी ही संबंधित मंडळाच्या अध्यक्षांची व सदस्यांची राहिलं तसेच मोटार अपघातांना आळा बसावा यासाठी मुलांना लहान वयात गाडी चालविण्याची संमती संबंधित पालकांनी देऊ नये आणि इतरांनी गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा लायसन्स काढून घेण्यात यावे व सोबत बाळगावे तसेच इतर कागदपत्रे सोबत ठेवावी मुलींची लग्ने 18 वर्षाच्या आत करू नयेत व मुलींना जास्तीत जास्त शिकवा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवु नका धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून धार्मिक सलोखा कसा टिकुण राहिलं यांचे मार्गदर्शन केले तसेच गावात कोणी अनोळखी संशयास्पद व्यक्ती आल्यास त्याला मारहाण न करता तात्काळ पोलिस स्टेशनला कळवावे किंवा 112 नंबरला फोन करावा तसेच इतर मोलाचे मार्गदर्शन माननीय पारखे साहेबांकडून लाभले
सदर कार्यक्रम सभेला विक्रमगड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी API रविंद्र पारखे साहेब, PSI दिपक ढुस साहेब, HC राहुल सावंत,HC उत्तम बिरारी,HC शिवाजी भोईर, HC सुनील पाटील उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत खुडेद सरपंच लहु नडगे, खुडेद पोलिस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम पांढरा, खुडेद ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त सदस्य धरतरी फाउंडेशनचे कार्यकर्ते भारत पाटारा, धर्मजागरणचे कार्यकर्ते संदीप पाटारा, गावातील प्रमुख व्यक्ती आनंद महाले,दामा गरेल, गोपाळ डोके,चिमा भोये, तुळशीराम भोवर,दिवाळ हरपाले,गणपत हरपाले, कृष्णा कनोजा, तसेच इतर ग्रामस्थ बंधु, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर