
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी साजरी केली दहीहंडी….
विक्रमगड प्रतिनिधी ji24newsप्रशांत दाव्हाड
विक्रमगड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोडी कुंडपाडा, पोस्ट सायवन, ता. डहाणू येथील श्री. श्रीकांत यशवंत पराड सर हे शाळेमध्ये नेहमी अग्रेसिव्ह असतात. मुलांना म्हणजेच विद्यार्थ्यांना नेहमी दिलासा देतात उत्साहीत ठेवतात तो मग कुठला ही उत्सव असो सण असो अथवा कोणता कार्यक्रम असो ते उत्साहाने साजरा करतात तसेच त्यांचे सहकारी उपक्रमशील श्री. शनवार बुंधे सर यांचा सुद्धा मोलाचा वाटा असतो आणि ते नेहमी प्रत्येक कार्यक्रम मध्ये या शाळेसाठी काही ना काही कल्पना करून योग्य रीतीने मुलांच्या ( विदयार्थ्यांच्या) येथील येणारे पालकांना प्रोत्साहित करून आणि येणारे कार्यक्रम पार पाडतात अश्याच प्रकारे काल दिनांक 07/09/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगोडी कुंडपाडा येथे अतिशय आनंदात दही हंडी (गोपाळकाला)उत्सव साजरा करण्यात आला, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना रुमाल बांधून काठीने हांडी फोडणे (मुलांची अचूकता ,नेम ,आणि अंदाज) या कलागुणांना वाव देण्यात आला……यामध्ये इयत्ता 3 री विद्यार्थ्यांनी कु.छकुली राजू खेतल हिने अचूक अंदाज घेत हांडी फोडली तिचे स्वागत करण्यात आली व बक्षीस देण्यात आले….मुलांनी खूप आनंद घेतला, या प्रसंगी गावचे नागरिक व शाळेचे प्रमुख शिक्षक श्री. शनवार बुंधे सर व उपक्रमशील शिक्षक श्री. श्रीकांत पराड सर उपस्थित होते
Total Users : 10829