
चंद्रकांत घाटाळ लिखित डम्पी विज्ञान कथा संग्रप्रकाशन सोहळा
ji24news
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय ,मराठी वाड्मय मंडळ व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डम्पी’ या विज्ञान कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक १६/९/२०२३ रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे आयोजित केला आहे.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. किरण सावे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील प्रसिद्घ खगोल अभ्यासक व विज्ञान लेखक श्री. चंद्रकांत घाटाळ हे *विज्ञान कथांची निर्मिती व आस्वाद या आपल्या मनोगतात खगोल अभ्यासक ते विज्ञान लेखक पर्यंतचा आपला प्रवास उलगडतील.
डहाणू तालुक्यातील कासा येथील चंद्रकांत घाटाळ यांनी स्वकर्तृत्वाने इथवर वाटचाल केली असून या उदयोन्मुख लेखकाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी व विशेषतः खगोल विषयक जिज्ञासूंनी तसेच विज्ञान कथाप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे.
Total Users : 10829