
संत नगाजी गोकुळाष्टमी यात्रा उत्साहात संपन्न…
प्रा. दिनेश राठोड (ji24news जिल्हा प्रतिनिधी -वर्धा)
हिंगणघाट : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणार्या हिंगणघाट तालुक्यातील श्री क्षेत्र पारडी (नगाजी) येथे दिनांक 6 ते 9 सप्टेंबर पर्यन्त विविध धार्मिक कार्यक्रमात गोकुळाष्टमी यात्रा उत्सव संपन्न झाला. कार्यक्रमात दैनंदिन हरिपाठ, पोथी पारायण, महा-आरती, व ह.भ.प. श्री लक्ष्मीकांत महाराज दुर्गे यांचे तीन दिवस नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दिनांक 9 तारखेस दुपारी 2 वाजता गोपाळकाला व 3 वाजता दही-हंडी फोडण्यात आली. भजन व बॅंड चे गजरामध्ये पालखीची भव्य मिरवणूक निघाली. तसेच लोटांगण घालणारे भक्त सुद्धा मोठ्या संखेत सहभागी झाले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने व भाविकाची तोबा गर्दी झाल्याने 2 किमी अंतरावर पार्किंग चे ठिकाणी आपली वाहने थांबवून भक्तांना दर्शनासाठी पायदळ जावे लागले. संपूर्ण विदर्भातून या यात्रेकरिता पन्नास हजाराहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. गोपालकाल्याचे व दही हंडीचे शीत मिळाले तरी भाविक धन्य होतात. दही हंडीचे वेळी वरुण राजाने सुद्धा आपली हजेरी लावली होती.
कार्यक्रमासाठी ट्रस्टचे चेअरमन श्री रामभाऊ भोयर, विश्वस्त श्री नरेंद्र मांडवकर, श्री प्रफुल बाडे, श्री सुनिलराव राऊत, श्री डॉ. अतुल घोरपडे, ॲड. सारंग अशोकराव दोड, श्री शंकरराव चाफले, श्री मनोज चिडे, श्री घनशाम खुनकर, तसेच संजय इंगोले, विनोद खुनकर, राजेंद्र भोयर, व तरुण उत्साही मंडळीचे सहकार्य लाभले.
Total Users : 10829