
पालघर जिल्ह्यातील प्रसिध्द खगोलअभ्यासक व लेखक श्री. चंद्रकांत घाटाळ यांना विशेष अतिथी म्हणुन सत्कार..
palghar. ji24news
रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त आदिवासी जनसेवा संस्थेने डहाणू तालुक्यातील सायवन या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचे अतिशय भव्य आयोजन केले होते. या स्पर्धेत स्थानिक खेळाडू सोबत पुणे ,मुंबई ,नाशिक ,ठाणे अश्या ठिकाणाहून खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील प्रसिध्द खगोलअभ्यासक व लेखक श्री. चंद्रकांत घाटाळ यांना विशेष अतिथी म्हणुन संस्थेने आमंत्रित करुन त्यांचा सत्कार डहाणूचे आमदार मा. विनोद निकोले साहेब यांच्यामार्फत केला. या प्रसंगी सायवनचे सरपंच मा. विष्णू बोरसा साहेब यांनी घाटाळ यांच्या बहुचर्चित ‘डम्पी’ विज्ञान कथासंग्रहाच्या प्रतीचे वाटप त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हापरिषद शाळांसाठी केले.
या कार्यक्रमासाठी आमदार निकोले साहेबांसोबत जि. प. सद्स्स मा. काशिनाथ चौधरी, डहाणू पंचायत समितीचे सभापती मा. प्रवीण गवळी , माजी सभापती मा. स्नेहलता सातवी ,एपीआय महाले साहेब, सामाजिक कार्यकर्ते राजू डोंबरे ,कासा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रभाकर भोये तसेच अनेक मान्यवर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
Total Users : 10829