ji24news

गारमाळ येथे रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला..

गारमाळ येथे रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला

प्रतिनिधी-दीपक भोये विक्रमगड

 विक्रमगड दि.२३/०९/२०२३ विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत खुडेद पैकी गारमाळ येथील ग्रामस्थांनी वयम् चळवळीचे सहकार्याने रानभाजी महोत्सव चे आयोजन केले होते.येथील महिलांनी जंगलात मिळणाऱ्या विविध १६ प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. या सर्व भाज्यांचे उपस्थित सर्व पाहुणे व ग्रामस्थ यांनी एकत्रित स्नेहभोजन केले.गारमाळ येथील महिलांना कोणत्या ऋतूत कोणती भाजी जंगलातून सहज मिळते आणि कोणती भाजी कशा प्रकारे तयार करायची तसेच येथील महिलांना जंगलातून मिळणाऱ्या रानभाजी चे विविध प्रकारचे औषधी गुणधर्माची माहिती आहे परंतु आता या रानभाज्या पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीत आणि आताच्या पिढीला या रानभाज्यांची पाहिजे तेव्हढी माहिती नसल्याने सध्या या भाज्यांचे आहारातील प्रमाण बरेचसे कमी झाले आहे.सध्याच्या रासायनिक औषधे व खतांच्या युगात बिना खतांच्या रानभाज्यांचे महत्व आणि जतन व संवर्धन याविषयीचे मार्गदर्शन वयम् चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि नंतर उपस्थित सर्वांनी तारपा या आदिवासींच्या पारंपरिक वाद्यावर नाचून आनंद व्यक्त करत रानभाजी महोत्सव साजरा केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे समीरजी व त्यांची टीम तसेच ठाणे येथील कविताताई व त्यांची टीम तसेच पेसा ग्रामसभा मोबिलायझर सुशिला पाटारा,वयम् चळवळीचे कार्यकर्ते देवेंद्र थोटगा, भारत पाटारा आणि बहुसंख्येने ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर