ji24news

मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या, घटनेनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर….

मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या, घटनेनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर….

पालघर मोखाडा :- दि .6 ऑक्टोबर (ji24news palghar, प्रतिनिधी) :

मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. अर्चना उदर या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची विद्यालयात जात असताना रस्त्यात हत्या झाली.

मोखाडा  आश्रम शाळेतून महाविद्यालयात जात असताना हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

12 वीच्या विद्यार्थीनीची गळा चिरुन हत्या
आश्रम शाळेतून महाविद्यालयात चालत जाणाऱ्या विद्यार्थीनीवर रस्त्यातच कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे समोर आली आहे. मोखाड्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात बारावीत विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अर्चना उदर या विद्यार्थिनीवर हा जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला आहे. अर्चना ही बारावीत शिक्षण घेत असून महाविद्यालय ते आश्रम शाळा अशा पाचशे मीटरचा रस्ता पायी जात असताना अर्चनावर हा हल्ला करण्यात आला. अर्चना सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला असून मोखाडा पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत मुलीचे आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमलं होतं. यातून तिची हत्या झाल्याची माहिती आता समोर आली आहे. प्रभाकर वाघिरे, असं आरोपीचं नाव आहे.

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा ओळखला जाणारा मोखाडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. गुन्हेगारीपासून कोसो दूर असलेल्या मोखाडा शहरात भरदिवसा एखादी अशीं घटना घडेल असा कुणी विचार पण केला नसेल काल एक अशीच घटना घडली एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या अर्चना उदार (वय १८) या मुलीची अज्ञाताने कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडलीय. त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
आता पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राथमिक तपासादरम्यान ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, संशयित आरोपी प्रभाकर वाघरे (वय २२) फरार झाला असून मोखाडा पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे पुढील तपास करीत आहेत.
आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्याने या आश्रमशाळेपासून ५०० ते ६०० मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दररोज चालत नेण्यात येते. अशावेळी शिक्षक या मुलांसोबत असतात. मात्र, आज सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे येत असताना निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानाच्या पाठीमागेच प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून हत्या केली. यावेळी तिच्या मैत्रीणीनी घाबरून आरडाओरडा केला. मात्र, काही लोक मदतीला धावण्याआधीच त्याने तिथून पळ काढला.

या घटनेनंतर मोखाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून या घटनेनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघर सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या आश्रम शाळांमधील व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा नेहमीच उघडकीस होतो. मात्र, विद्यार्थिनीच्या झालेल्या या हत्येनंतर आश्रम शाळांमधील विद्यार्थिनी भीतीच्या छायेखाली आहेत. 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर