
उत्तर कोंकणातून मॉन्सूनची माघार ….
palgharji24news
दिनांक: 06 ऑक्टोबर, 2023,
आज नैऋत्य मान्सून पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणचा काही भागातुन तसेच संपूर्ण उत्तर अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतलेली आहे.
पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशच्या उर्वरित भागांतून नैऋत्य मान्सून माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणाचा काही भागतुन तसेच महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भागातुन पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मान्सून माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
पालघर हवामान अंदाज …..
भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात
पुढील पाच दिवस उघडीप राहण्याची शक्यता आहे.
तसेच कमाल तापमान ( दुपारचे तापमान ) 2-3 अं. से. वाढण्याची शक्यता असून 33 ते 36 अं. से. राहण्याची शक्यता आहे.
कृषि सल्ला
पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता असल्याने तयार झालेल्या भाताची कापणी करून घ्यावी.
तापमान वाढण्याची शक्यता असल्याने नवीन फळ बागेला गरजेनुसार पाणी द्यावे.
जिल्हा कृषि हवामान केंद्र,* *ग्रामीण कृषि मौसम सेवा, *कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर
Total Users : 10829