
कृषीदुतांकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन…..
palghar ji24news
सध्याच्या युगात स्पर्धेला फार महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकजण एकमेकाशी स्पर्धा करू पाहतोय.स्पर्धेत उतरल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळकट होतो.विद्यार्थ्यांमधील लपलेला कलावंत बाहेर येतो.याच स्पर्धेत आपले विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव अंतर्गत, उद्यानविद्या महाविद्यालय सरळगावच्या कृषीदुतांकडून (कृषीदुत:-मयूर जाधव, ऋषिकेश हाडे,अनिष पाटील,मनिष भोसले,प्रज्वल प्रधान,सुयश सूर्यवंशी) जिल्हा परिषद शाळा कळमखांडे येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.यावेळी अतिउत्साही असलेल्या विद्यार्थ्यांकडून भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला.कृषीदुतांकडून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला व उत्कृष्ट रेखाटणास पारितोषिक वितरण ही करण्यात आले.
Total Users : 10829