
श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्ताने वाचन वाचन प्रेरणा दिन साजरा…
प्रा. दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडणेर येथील
श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे वाचन प्रेरणा दिन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर या दिवशी असतो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे आहे.
डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.शाळा-महाविद्यालयात असताना प्रत्येक विद्यार्थांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, हे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिवसाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त शालेय पुस्तकी वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. अवांतर वाचन केल्याने विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते. इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होते. असे मत आजच्या कार्यक्रमाच्या आयोजिका महाविद्यालयाच्या ग्रंथापाल डॉ.सारिका चौधरी यांनी आपले विचार व्यक्त केले.
महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शिवाजी महाराज तुकडोजी महाराज महात्मा गांधी यासारख्या भारतातील व विदेशातील थोर महापुरुषांची विचारवंताची पुस्तके वाचण्यात देण्यात आली विद्यार्थ्यांनी वाचन कक्षामध्ये सुमारे चार तास शांततेने विविध पुस्तकांचे वाचन करून योग्य तो प्रतिसाद दिला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वाचन स्पर्धा घेण्यात आली वाचन स्पर्धेमध्ये भाषेची निवड विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे झाली. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त समारंभीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य उत्तम पारेकर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.नितेश तेल्हांडे प्रथम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले प्राचार्य उत्तम पारेकर अध्यक्ष भाषण करताना म्हणाले की डॉक्टर कलाम विज्ञानात झोपणारी माणूस होती त्यांनी अश्व क्षेपणा प्र बनविले राष्ट्रीय एकात्मतेसाठी समाजासाठी कार्य केले पाहिजे यश मिळाले की स्वस्त बसू नका निरंतर कार्य करा चुकल्याशिवाय माणूस घडत नाही. मनुष्य अनुभवातून घडतो विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहे अशी शोकांतिका व्यक्त करून ग्रंथालयामधील पुस्तके आणि वाचनाचे महत्त्व सांगितले प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे वाचन करून विचार आत्मसात केले पाहिजे प्राध्यापक नितेश तेल्हांडे भाषण करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून महापुरुषांचे विचार व आचार याचा फरक अभ्यास करून महापुरुषांचे विचार अवगत केले पाहिजे डॉक्टर कलाम यांचे कार्य सांगून कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रास्ताविक भाषणेत सांगितले की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याची महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले . कार्यक्रमाची संचालन प्रा.डॉ. संजय दिवेकर यांनी तर उपस्थित त्यांचे आभार तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली

Total Users : 10829