ji24news

वृक्ष प्राधिकारणकडून केवळ वृक्ष तोंडीची परवानगी मात्र समिति विकसकांमासाठी असल्याचा आरोप होतोय .

पालघर: पालघर नगरपरिषदेची वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन झाली असली समितीच्या बैठकीत विविध विकासकांच्या विकास हद्दीतील झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याशिवाय इतर कामे केल्याचे दिसत नाही. त्यामुळे ही      समिती विकासकांसाठी स्थापन केली आहे की काय? असा आरोप होत आहे.
             पालघर नगर परिषद घरपट्टीद्वारे वृक्षकराच्या नावाखाली प्रचंड कर वसूल करत आहे. मात्र प्रत्यक्षात खर्चच होत नसल्याचे दिसून येते. वृक्ष मोजणी व नोंदणी, त्यांना ओळख क्रमांक देणे, झाडाची नावे, त्याचे वय, झाडांचे वर्गीकरण व प्रकार अशा पाटय़ा लावणे, नव्याने वृक्षारोपण करणे, वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करणे अशी कामे झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे. पालघर नगर परिषद हद्दीमध्ये झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. नवनवीन गृहसंकुले, इमारती उभी राहात आहेत. ही गृहसंकुले उभी राहात असताना व त्यांना परवानगी देताना नगर परिषदेने वृक्षारोपण करण्याच्या अटी-शर्ती बंधनकारक केलेल्या आहेत. विकासक वृक्षरोपणाचा निधी नगर परिषदेकडे जमा करतात. मात्र या निधीतून प्रत्यक्षात वृक्षारोपण केले जात आहे किंवा नाही हे गुलदस्त्यातच आहे. जे वृक्षारोपण केले जात आहे त्या वृक्षांचे संवर्धन केले जात नाही, असे सांगितले जाते. दरवर्षी पालघर नगर परिषद वृक्ष कराच्या नावाखाली प्रत्येक घरपट्टी अंतर्गत करदात्यांकडून पंधरा रुपये कर आकारणी करते असे लाखो रुपये दरवर्षी वृक्ष कर लेखाशीर्ष खाली जमा होत आहे. मात्र प्रत्यक्षात हा पैसा खर्च होतो का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बाबत प्रभारी मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्याशी संपर्क केला असता एका कामाच्या भेटीकरिता आलो असून या विषयावर नंतर बोलतो असे सांगितले.
समितीची उदासीनता
झाडांशी संबंधित इत्यंभूत माहिती गोळा करून त्यांचे संकलन करणे, हे समितीचे काम आहे. पर्यावरणीयदृष्टय़ा झाडांचे महत्त्व पटवून देणे, वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संवर्धन याचबरोबरीने बांधकाम परवानगी देताना विकासक नियमानुसार वृक्षारोपण करत आहे की नाही याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत आहे.
पालघर नगर परिषदेत बोगस कारभार सुरू आहे. जनविकासाची कामे सोडून सर्व जण स्वार्थ साधण्यात मग्न आहेत. वृक्ष प्राधिकरण समितीची डळमळीत अवस्था आहे. ती फक्त विकासकांसाठी मर्यादित आहे. नगर परिषदेवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.-सचिन पाटील, माजी नगरसेवक,पालघर नगरपरिषद.
         पालघर: पालघर नगरपरिषदेची वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन झाली असली समितीच्या बैठकीत विविध विकासकांच्या विकास हद्दीतील झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याशिवाय इतर कामे केल्याचे दिसत नाही

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर