
कु.तन्वी निलेश वरठा,वारली आदिवासी मुलीची जागतिक संघटनेच्या (UNO)15ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 5 दिवसीय रोम इटली येथील जागतिक आदिवासी युवा फोरम (Global indigenous youth forum ) मध्ये सहभाग.
पालघर जोहार इंडिया 24 न्यूज –
पालघर जिल्हातील माहीम गावची कु.तन्वी निलेश वरठा ही निलेश वरठा आणि किर्ती वरठा यांची मुलगी आहे. निलेश वरठा हे रेल्वे मध्ये मोटरमन आहेत तर किर्ती वरठा ह्या आदिवासी एकता परिषदच्या केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य असून सामाजिक कार्यकर्त्यां आहेत. यांची तन्वी कन्या असून आताच तिला मुंबई च्या सुप्रसिद्ध जे. जे. समूह मेडिकल कॉलेज मध्ये MBBS ला प्रवेश मिळाला आहे.
आताच तिने जागतिक संघटनेचे च्या अन्न आणि शेती संघटनेच्या जागतिक आदिवासी युवा फोरम मध्ये आपले नाव नोंदवले होते. जागतिक आदिवासी युवा निवड प्रक्रियेत तन्वीचीं भारत देशातून वारली जमातीची युवा सदस्यातून निवड झाली. 15 ऑक्टोबर 2023ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत इटली रोम येथे होणाऱ्या दुसऱ्या जागतिक आदिवासी युवा फोरमच्या सत्रा मध्ये आमंत्रित केले आहे. तन्वी भारतातील आदिवासी युवकांचे नेतृत्व करत आहे. या सत्रा मध्ये आदिवासीचे परंपारीक ज्ञान, पारंपारीक अन्न आणि पारंपारिक शेती पद्धती या विषयावर आपले विचार मांडणार आहे.
तन्वी निलेश वरठा हिची जागतिक स्तरावर झालेल्या निवडी मुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाची मान उंचावली आहे. आदिवासी सामाजाला तन्वी चा अभिमान आहे. समाजबांधवान कडून तन्वी चे खूप कौतुक होतं असून तिला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.
Total Users : 10829