ji24news

श्री गणेश विद्या मंदिर शाळेत नवरात्र निमित्त विदयेची देवता सरस्वती देवीची स्थापना , नऊ दिवस आराधना.

श्री गणेश विद्या मंदिर शाळेत नवरात्र निमित्त विदयेची देवता सरस्वती देवीची स्थापना , नऊ दिवस आराधना .


दिवा – ji24news(सचिन शेलवले )
दिवा – (सचिन शेलवले ) दि .१७/१०/२३ रोजी दरवर्षी प्रमाणे नेहमी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र निमित्त विद्येची देवता सरस्वती देवीची स्थापना श्री गणेश विद्यामंदिर दातिवली दिवा या शाळेत केली आहे . जवळ जवळ दरवर्षी प्रमाणे १० वर्षे या कार्यक्रमाला झाली आहेत . स्टेजवर सुंदर आकर्षक मखर बनवून , सुंदर देखावे बनवुन रंगीत दिव्यांचा झगमगाट तसेच शाळेची ईमारत सुशोभिकरण करून . सर्व ईमारतीवर रंगीत लाईटची सुंदर रोषणाई पहायला मिळते. सकाळी शाळेचे सचिव श्री साईनाथ म्हात्रे यांच्या उपस्थितीत देवीची आरती होते . ते दररोज देवीची पुजा, पाठ नित्य नियमाने नऊ दिवस करतात . जेणे कडुन आमच्या शाळेच्या मुलांच्या शिक्षणात कोणतेही विद्म येऊ नये तसेच शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत राहो अशीच ईच्छा प्रकट करून विद्येची देवता सरस्वतीला हाक घालतात . सकाळी काही मुले तसेच शिक्षक वृंद तसेच संस्थेचे पदाधिकारी देवीची आरती ढोलकी, ताल, खंजिरी ही वादय मुले वाजवून तालासुरात माईकमध्ये म्हणतात . दसऱ्याच्या आदल्या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेची स्वच्छता करून सुंदर हार, फुले, पताके लावून, देवीचे फोटो लावुन , रांगोळ्या कादुन सर्व वर्ग खोल्या, ऑफिसची व शाळेची सुंदर सजावट करतात . शेवटच्या दिवशी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, माय मदर इंग्लीश स्कुल, तसेच जिजाऊ कला संस्कार केंद्र चे सर्व विद्यार्थी रंगीबेरंगी ड्रेस घालुन पटांगणात देवीच्या समोर गरबा खेळतात . त्यानंतर देवीचा प्रसाद वाटला जातो . सर्व शिक्षिका वृंद व पालक , सर्व शिपाई मावश्या यांचा भोंडल्याचा कार्यकम होतो . अशा प्रकारे नऊ दिवस शालेय वातावरण प्रसन्न राहते . सर्वांना शाळेत यायला उत्साह वाटतो . शेवटी कार्यक्रमाची सांगता होते

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर