
गांगापूर येथे सिमेंट रोड व स्ट्रीट लाईट उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे निवेदनातून मागणी
प्रा.दिनेश राठोड (Ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर येथील फक्त तीनशे फूट सिमेंट रोड साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे व सचिन महाजन मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्याकडे मुंबई मंत्रालय ऑफिस मध्ये निवेदनातून मागणी केली आहे , या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गांगापूर येथील नवीन वस्ती वार्ड क्रमांक दोन मध्ये रस्ता हा 300 फूट खोल चिखलामुळे रस्त्याची दुरवस्था झाली, असून नागरिकांना महिलांना वाहन चालकांना खूप त्रास सहन करावे लागत आहे गेली पंधरा ते वीस या वर्षापासून या गावात 130 कुटुंब राहत असून काही नवीन प्लॉट पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास तर होतो शिवाय व त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोलची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी या रस्त्याची रस्त्यासाठी रवी कवडे यांच्या घरापर्यंत हा तीनशे फूट रस्ता आहे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी तसेच स्ट्रीट लाईटचे पोल देण्यात यावे गेल्या मागच्या वर्षी माननीय श्री आमदार समीर कुणावर यांना निवेदन दिले आहे 25 वर्षा पासून गावाकडे दुर्लक्ष झाले आहे व जिल्हा परिषद पोहना सर्कलमधील एक गंगापूर गाव आहे या विषयाकडे गांभीर यांनी लक्षदेण्यासाठी निवेदन याकरिता सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गोडे व पत्रकार सचिन महाजन यांनि मुबंई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ऑफिस मध्ये निधी उपलब्ध करून दयावा त्याकरता आज व्हॉट्सप व टेक्स्ट मेसेज द्वारे व मंत्रालय मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले आहे, सामाजिक कार्यकर्ते नारायन गोडे व सचिन महाजन यांनी फक्त 300 फूट रोड ची मागणी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नितीन गडकरी साहेब,खासदार रामदास तडस ,जिल्हाधिकारी राहुल कर्डीले साहेब रामदास तडस रामदास आबटकर यांच्या कडे केली आहे ,
Total Users : 10829