
पेसा शिक्षक भरती प्रक्रिया थांबल्यामुळे तरुणीचा नैराश्यामुळे मृत्यू …जव्हार !
पालघर : ji24news प्रतिनिधी -दीपक भोये विक्रमगड
तरुणीचा अकस्मात मृत्यू………
पालघर : पेसा शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे एका उमेदवार तरुणीचा नैराश्यामुळे मृत्यू झाल्याची घटना जव्हारमध्ये घडली.
पेसा शिक्षक भरतीमध्ये पात्र ठरलेल्या ताई गणपत गभाले हिला भरती प्रक्रिया थांबल्यानतर नैराश्याने घेरले होते. यापूर्वी २०१४ साली झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत ताई गभाले पात्र ठरली होती. मात्र या भरतीवर स्थगिती आल्यामुळे ती नैराश्यात गेली होती. त्यातच पुन्हा पेसा शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र ठरून देखील नोकरी पासून मुकल्यामुळे नैराश्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या प्रसार माध्यमांवर पेसा भरतीचा पहिला बळी या मथळ्याखाली ताई गभाले हीचे छायाचित्र प्रसारित होत असून परिसरातून शासनाच्या कार्यप्रणाली विरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
Total Users : 10829