ji24news

खासदार तथा जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य व आमदार यांच्या मध्यस्थीने बिगर आदिवासींचे उपोषण स्थगित…!

खासदार तथा जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य व आमदार यांच्या मध्यस्थीने बिगर आदिवासींचे उपोषण स्थगित…!

कुडुस –  – (सचिन शेलवले )

खासदार तथा जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य राजेंद्र गावित व आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीने बिगर आदिवासींचे उपोषण स्थगित
पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु असलेल्या पेसा शिक्षक भरती मध्ये
सरळसेवा पद्धतीने सुरु असलेल्या ऑफलाईन भरतीमधील शिल्लक राहिलेल्या रिक्त पदांवर बिगर आदिवासी पात्र स्थानिक उमेदवारांची भरती करावी. तसेच पेसा क्षेत्रातील क व ड संवर्गातील सर्वच पदभरतीमध्ये बिगर आदिवासी समाजातील पात्र स्थानिक उमेदवारांची भरती करावी. या मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजातील नोकरी पात्र उमेदवारांनी दि. २५ ऑक्टोबर पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते.
या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी दि. २६ ऑक्टोबर रोजी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व पेसा क्षेत्राशी निगडीत असलेल्या निर्णायक अशा जनजाती सल्लागार परिषदेचे सदस्य राजेंद्र गावित तसेच बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी राजेंद्र गावित यांनी पेसा क्षेत्रातील सर्वच जिल्ह्यांतील वादांकित आरक्षणावर तोडगा काढून आदिवासी व बिगर आदिवासी अशा सर्वच समाजांना न्याय मिळण्यासाठी लवकरच शासन स्तरावर एका बैठकीचे आयोजन करुन समान न्यायाच्या दृष्टीने तोडगा काढला जाईल तसेच उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्यांचा विचार करुन बिगर आदिवासी समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले.
तर आमदार राजेश पाटील यांनी लवकरच आदिवासी-बिगर आदिवासींमधील आरक्षण व समज-गैरसमजांबाबत पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी व बिगर आदिवासी समाज घटकांच्या शिष्टमंडळासोबत समन्वयाची बैठक करण्याबाबत मनोदय व्यक्त केला.
वरील दोन्ही लोकप्रतिनिधी व जनजाती सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी सदर आंदोलनात स्थगित करत असल्याची घोषणा केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने चर्चा करण्यासाठी बिगर आदिवासी समाजाच्या वतीने कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, कुणबी समाजनेते जितेंद्र राऊळ, संपादक शरद पाटील, आंदोलन समन्वयक युवराज ठाकरे, प्रशांत पाटील, अॅड. राहुल ठाकरे, दिपेश पावडे, ऋषिकेश सावंत, यांनी प्रमुख भूमिका बजावली.
यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे, सदस्या भक्ती वलटे, पालघर पंचायत समिती सदस्य कमळाकर अधिकारी, तृप्ती पाटील, माजी जि. प. सदस्य रमेश डोंगरे, कुणबी सेना नेते परशराम सावंत, कुणबी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश पाटील, स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, शिवसेना नेते उत्तम पिंपळे, ज्ञाती समाज मंडळाचे पालघर जिल्हा अध्यक्ष संतोष पावडे, कॉंग्रेस आयचे वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, कुणबी सेना वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक घरत,  यांच्यासहित विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर