
वाडा तालुक्यातील कोकणीपाडा नादुरुस्त पुलामुळे रस्त्यापासून वंचित ….
प्रतिनिधी ji24news-दिपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदार संघात येत असलेल्या वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बीलघर मधील वडवली पैकी कोकणीपाडा ६० लोकसंख्या असलेला पाडा हा वाडा – सोनाळे या मुख्य रस्त्यापासून १ किलोमीटर अंतरावर आहे . या पाड्यात जाण्यासाठी गावालगत अघई परिसरातून वाहत येणारा नाला आडवा येत आहे.या नाल्यावर खूप वर्षापूर्वी पूल बांधण्यात आला होता परंतु अती पावसाच्या पाण्यात पुलाचा अर्धा भाग महापुरात वाहून गेल्याने आजही या पुलाची स्थिती तशीच आहे. कोकणीपाडा या गावास जोडणाऱ्या या पुलाच्या नादुरुस्तीमुळे येथील शाळेत जाणारे लहान लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच येथील ऐन पावसाळ्यात एखादा रुग्ण दवाखान्यात घेऊन जाण्यास आणि शेतीचे काम करताना ट्रॅक्टर ने – आन करताना खूप अडथळे येत असून या गंभीर समस्येकडे येथील शासन ,प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.येथील ग्रामस्थ मतदारांचा केवळ मतदानाकरिता वापर केला जात असल्याचे येथील माजी सैनिक काशिराम भोये यांचे म्हणणे आहे.आज मितीस देश अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना अनेक गाव पाडे अजूनही मुख्य सोयी सुविधेपासून वंचित आहेत.आम्हाला आमच्या गावात येणाऱ्या रस्त्यातील नादुरुस्त पुलाचे नवीन बांधकाम करून लवकरात लवकर पूर्ण करून मिळावे अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
यावेळी लोक क्रांती सेनेचे पदाधिकारी मा.दिनेशजी पाटील साहेब ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष, मा. गणेशजी शेलार साहेब जिल्हा उपाध्यक्ष,विष्णूजी जाधव तालुका अध्यक्ष,विक्रमगड तालुका अध्यक्ष भारत पाटारा आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Total Users : 10829