ji24news

यशवंत महाविद्यालय भिडी च्या विद्यार्थ्यांकडून बेघर रुग्णांना आर्थिक मदत..

यशवंत महाविद्यालय भिडी च्या विद्यार्थ्यांकडून बेघर रुग्णांना आर्थिक मदत

प्रा .दिनेश राठोड (ji24news)
वर्धा.

यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथील विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक व शिक्षक मिळून समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या बेघर मनोरुग्ण, निराधार दुर्लक्षित घटकांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा समाजातील इतर लोकांप्रमाणे त्यांना जीवन जगता यावे याकरिता यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशन च्या सहकार्याने दिनांक 01नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयांच्या प्राचार्य उर्मिला मसराम तसेच नंददीप फाउंडेशनचे प्रा. प्रफुल्ल चौके प्रा. कावडे, सौ संजीवनी भोयर मॅडम कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. अरविंद राठोड इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रफुल्ल चोके यांनी बेघर मनोरुग्णांविषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच प्राध्यापक कवडे यांनी नंददीप फाउंडेशनच्या कार्यक्रमाविषयी तसेच समाजातील दुर्लक्षित असलेले घटक आणि अशा या घटकांना समाजामध्ये सामावून घेण्याची नितांत आवश्यकता असून अशा बेघराना आपण मदतीचा हात द्यावा अशा प्रकारच्या आवाहन त्यांनी केले. प्राचार्य मसराम मॅडम यांनी सुद्धा विस्तृत माहिती दिली. प्रा. अरविंद राठोड यांनी नंददीप फाउंडेशनचे हे उपक्रम अतिशय कळकळीचे जिव्हाळ्याचे मायेचे बळ देणारे असून हा उपक्रम स्तुत्य असून नंददीप फाउंडेशनचे प्रशंशा केली. याप्रसंगी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मदतीचा हात देऊन सहयोग राशी दिली या कार्यक्रमाचे संचालन निशा कापकर मॅडम यांनी केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर