
वैद्यकीय रुग्णालयातील अव्यवस्थेच्या विरुद्ध रुग्णमित्र गजू कुबडे यांचे 7 नोव्हेबर पासून चालते फिरते अन्नत्याग आंदोलन
प्रा.दिनेश राठोड (ji24news)
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत स्थानिक आमदार मा.समीरजी कुणावर याना दिले निवेदन
हिंगणघाट मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालयाची भलीमोठी इमारत डौलाने अनेक वर्षापासून उभी आहे.परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड सुविधाचा अभाव आहे त्यात प्रामुख्याने
1) बालरोगतज्ज्ञ यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी,
2) सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी रेडीओलॉजिस्टची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी
3) जनरल फिजिशियन ( एम डी) डॉक्टर ची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी 4) गावभर वाजागाजा करून उद्घाटन केलेले व त्याच दिवसापासून बंद असलेल असलेले
मॉड्युलरवआय.सी.यू. त्वरित सुरू करण्यात यावे तसेच रोगराईचे मुख्य कारण असलेल्या साफसफाई करीता उपजिल्हा रुग्णालयात सफाई कामगारांची भरती करण्यात यावी मागणी साठी प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे हे दि 7 नोव्हेबर पासून चालते फिरते अन्नत्याग आंदोलन सुरु करणार असून विशेष म्हणजे कुबडे यांचे हे आंदोलन एका जागेवर बसून न करता चालत्या फिरत्या स्वरूपात असणार आहे
या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात असंख्य समस्या आहेत. परंतु या समस्याकडे स्थानिक आमदारांनी लक्ष।द्यावे, असे आवाहन रुग्णमित्र कुबडे यांनी केले व .केवळ रस्ते व नाल्या याचे बांधकाम करून जनतेला न्याय मिळू शकत नाही. आज येथील शेतमजूर गिरणी कामगार वंचित व गोरगरीब जनतेला आरोग्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात छोट्या मोठ्या गोष्टींसाठी एखाद्या रुग्णाला भरती केले तर येथील डॉक्टर त्या पेशन्टला त्वरित सेवाग्राम सावंगी किंवा नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला देतात.
त्यामुळे रुग्णांची हेळसांड गोरगरीब जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकून एकदा नाही तर दोनवेळा या मतदार संघाची सेवा करण्याची संधी दिली आहे म्हणून आमदार साहेबांनी या बाबीकडे जातीने लक्ष देऊन रुग्णांचे व गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी म्हटले आहे,
आणि जातीने लक्ष दिल्यास येथील जनता आमदाराला कार्यसम्राट म्हणून डोक्यावर घेऊन निश्चित पणे नाचेल.असे मत कुबडे यांनी व्यक्त केले आहे.
यासाठी त्यांनी सर्वप्रथम येथील आरोग्याच्या महत्वपूर्ण प्रश्नकडे लक्ष द्यावे अशी विनंती करुंन व या आरोग्याच्या प्रश्नासाठी येत्या 7 नोव्हेबर पासून चालते फिरते बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचीच राहणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील समस्या सोडविण्यासाठी तात्काळ लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेऊन व जसे रस्ते व नाली बांधकामसाठी निधी खेचून आणता असे यासाठी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन
रुग्णमित्र कुबडे यांनी केले आहे.
Total Users : 10829