
मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विक्रमगड येथे आदिवासी संघर्ष समिती शिष्टमंडळासोबत विविध विषयांवर बैठक संपन्न…
आज तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या दालनात आदिवासी संघर्ष समिती शिष्टमंडळ समवेत बैठक पार पडली सदर बैठकीत खालील विषयांवर चर्चा पार पडली.
????रोजगार हमी काम लवकर चालू व्हावं यासंदर्भात चर्चा झाली. उद्या पासून काही ग्रामपंचायतींमध्ये काम चालू होईल. कामाची जशी मागणी केली जाईल त्याप्रमाणे काम करण्यात येतील रोजगार सेवक यांना पण त्याप्रमाणे सूचना करण्यात आलेल्या आहेत. तहसीलदार यांनी सांगितलं. तसेच मागणीनुसार मस्टर काढण्यात येतील त्यात delay होणार नाही. तसे होत असल्यास निदर्शनास आणून द्यावे.
???? सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांनी पण सांगितलं की काम वेवस्थित केली जातील.
ज्या ठिकाणी estiment नुसार काम होत नसेल ते निदर्शनास आणून द्यावे साईटल विझिट देऊन नियमानुसार काम केलं जाईल याबाबत शास्वती दिली.
???? वीज महावितरण बाबत विविध समस्यांवर चर्चा झाली वीज महामंडळ कडून कनिष्ठ अभियंता हजर होते.
????जे लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत त्यांना त्या पद्धतीचे नियमाने मीटर देण्यात यावेत. कारण याबाबत बिल चे नियम वेगळे आहेत. दारिद्य रेषेखाली असून पण नाहक वीजबिल अतिरिक्त गरीब बांधवांना भरावा लागतो.
तसेच या पद्धतीने मीटर देण्यासाठी शिबिर राबवण्यात यावे याबाबत चर्चा झाली.
????ज्या गावांमध्ये लाईन खेचलेली आहे परंतु लाईट अजून चालू नाही अशा गावांची लाईट येत्या 10 तारखेपर्यंत चालू केली जाईल असे कनिष्ठ अभियंता यांनी सांगितलं.
त्याचप्रमाणे ज्यांना चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य बिल आले आहे त्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल.
???? जलजीवन मिशन संदर्भात संबंधित पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उपस्थित राहणे आवश्यक होते परंतु ते न येता शाखा अभियंता हजर राहिले.
जलजीवन मिशन संदर्भात चर्चा करताना असे निदर्शनास आले की, जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे हे प्रकर्षाने समोर निदर्शनास आले आहे.
जलजीवन मिशनचे काम नियमबाह्य पद्धतीने होत आहे.
एस्टीमेंट नुसार होत नाही हे निदर्शनास आले.
तसेच काही प्रमाणात ठेकेदार यांना यापुढे बिल अदा करण्यात येऊ नयेत याबाबत अभियंता यांना सूचित केले आहे.
तसेच आपण साईट वर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी काम कसे चालू आहे.
जी खोदाई करून पाईपलाईन टाकली जात आहे ती सुद्धा नियमबाह्य आहे ती खोदून चाल करण्यात यावी असे सूचित केले आहे.
वेवस्थित समाधानकारक उत्तर अभियंता यांच्याकडून न मिळाल्यामुळे आदिवासी संघर्ष समितीने ने जलजीवन मिशन या विषयावर स्वतंत्र बैठक संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी कार्यकारी अभियंता यांच्या समवेत आयोजित करावी याबाबत मागणी केली.
लवकरच आम्ही बैठक लावतो असे आश्वाशीत केले.
जर जलजीवन मिशन काम वेवस्थित न झाल्यास पंचायत समिती पाणी पुरवठा विभागावर जनआंदोलन करण्यात येईल असे ठणकावून सांगितलं.
अशा पद्धतीने विविध विषयांवर सकारात्मक चर्चा पार पाडली.
चर्चेला उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे आभार तसेच तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहून जनहिताची निर्णायक चर्चा घडवून आणली त्याबद्दल त्यांचे ही आदिवासी संघर्ष समिती विक्रमगड व समाज बांधवांचे वतीने आभार.
आदिवासी संघर्ष समिती विक्रमगड
Total Users : 10829