
क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित..
प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या एकशे तेह्त्तीसाव्या स्मृतीदिनानिमित्त श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय ,वडनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वेणा लोकप्रबोधन शिक्षण संस्थेचे सह सचिव अविनाश गमे होते तर प्रमुख उपस्तिथी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ सारीका चौधरी होत्या .
यावेळी सर्व प्रथम महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला .यानंतर मान्यवरांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सामाजिक आणि त्यांनी शैक्षणिक कार्या बाबत विचार मांडले .त्यांच्या विचारांचा वारसा सामाजिक आणि शक्षणिक उन्न्नतीसाठी आवश्यक असल्याचे मत प्रतिपादन केले .
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समिती द्वारे करण्यात आलेले होते ,कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सांस्कृतिक समिती समन्वयक डॉ.प्रवीण कारंजकर यांनी केले ,या कार्यक्रमाला डॉ.नरेश भोयर ,डॉ.गणेश बहादे ,नरेश कातडे ,शंकर कापसे ,प्रीती सायंकर,सुरेश तेलतुमडे,विजयालक्ष्मी जारोंडे इत्यादी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्तिथ होते .
Total Users : 10829