
पालघरमधील जिल्हा परिषद शाळा शाळा बनल्या “स्मार्ट”
जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी
ओ.एन.जी.सी. (Oil and Natual Gas Corporation) यांच्या सामाजिक दायित्व निधी आणि थिंकशार्प फाऊंडेशन च्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा शिरोशी ता जव्हार जि.पालघर येथे डिजिटल वर्गाचे(स्मार्ट क्लास) उदघाटन आज शिरोशी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच योगिता शेंडे, ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मनोज कामडी , सदस्य विनोद खरपडे सदस्या सुप्रिया अंधेर,शुभांगी शेंडे,नर्मदा शेंडे ग्रामसेवक बळवंत गवळी व शाळेचे मुख्याध्यापक संदीप खेडकर सर रामकृष्ण मिशन च्या सहशिक्षिका रेखा कामडी व अंगणवाडी सेविका इतर मान्यवर उपस्थित होते.
बदलत्या काळानुसार माहिती तंत्रज्ञानात झालेल्या डिजिटल क्रांतीने सारे जग एकत्र आले आहे. तंत्रज्ञानाची ओळख जर शालेय जीवनातच विध्यार्थ्यांना झाली तर प्रगत तंत्रज्ञानाबरोबर प्रगती करण्याची संधी त्यांना मिळेल तसेच विद्यार्थ्यांमध्ये आधुनिकतेची आव्हाने पेलण्याची क्षमता विकसित होईल हे ओळखून थिंकशार्प फौंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवला जात आहे.
ओ.एन.जी.सी. च्या सामाजिक दायित्व निधीतुन मागील ३ वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यातील ४० शाळांना स्मार्ट बनवले आहे. तसेच यावर्षी नविन ४९ शाळांना डिजिटल बनवण्यात आले आहे यात पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई, वाडा, जव्हार , तलासरी या तालुक्यांमधील शाळांचा समावेश आहे.” स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड चे वैशिष्ट म्हणजे यामध्ये अँड्रॉइड आणि विंडो असे दोन्ही प्लॅटफॉर्म एकाच सिस्टिम मध्ये वापरता येतात. संपूर्ण टचस्क्रीन असलेल्या या बोर्ड मध्ये वेगवेगळे अँप्लिकेशन त्यामधे डिजी लायब्ररी आणि बालभारती अभ्यासक्रम सॉफ्टवेअर वापरून ऍडव्हान्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना शिकवलं जाऊ शकता तसेच यामध्ये शाळेचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑफलाईन दिलेला आहे या बोर्डच्या वापराचे संपूर्ण प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी याचा पूर्णपणे वापर करू शकतात.. याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच फायदा होईल.
Total Users : 10829