
जल जीवन मिशन योजनेची प्रचार प्रसिद्धी करणेसाठी निबंध, चित्रकला व वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन.
जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व कुटूबांना गुणवत्तेसह, पुरेसे व नियमित स्वरूपात पिण्याचे पाणी मिळावे. गावात जल जीवन मिशन अतंर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनामध्ये लोक सहभाग वाढावा व योजनेत पार्दर्शकता राहावी. याकरीता ग्रामीण जनतेला या योजेनेची माहिती व्यापक प्रचार, प्रसिद्धी होणेसाठी विविध उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांचे मार्गदर्शनात सुरू आहेत.
शालेय विद्यार्थ्यामध्ये योजनेची जनजगृती करणेसाठी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शांळामध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा तर सर्व कनिष्ट महाविद्यालय व वरिष्ट महाविद्यालयात वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक स्पर्धेतील जिल्हास्तरीय प्रथम, व्दतीय, तृतीय क्रंमाक निवड करण्यात येईल. जिल्हा स्तरीय बक्षीसे पुठिल प्रमाणे आहेत. प्रथम क्रमाकास 21,000 हजार रूपये सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र, द्वितीय क्रमांकास 11,000 हजार रूपये सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र, तृतीय क्रमांकास 5,000 हजार रूपये सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र असे आहे.
या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांना केले.
Total Users : 10829