
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेअंतर्गत कार्यक्रम….
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड
खोस्ते(विक्रमगड) ग्रामपंचायत कार्यालय हद्दीत विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमे अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ड्रोनच्या साह्याने भात पीक फळभाज्या आधुनिक पद्धतीने फवारणी कशी केली जाते, हे दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे विकसित भारत संकल्प यात्रा दरम्यान आरोग्य विभागामार्फत टीबी व एक्स-रे व बीपी शुगर व आदीसह आयुष्यमान कार्ड, बँक व विविध योजना विषयी माहिती देण्यात आली. उज्वल गॅस योजना ग्रामपंचायत व शासनाच्या विविध योजना राबविणे बाबत माहिती दिली. या वेळी सरपंच नीलम भास्कर भोये, ग्राम विकास अधिकारी संजय वाघ साहेब, उपसरपंच व सदस्य व ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
Total Users : 10829