विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड विक्रमगड – पालघर जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष भारतीय ट्रायबल पार्टी, आदरणीय आप संजय घाटाळ साहेब, विक्रमगड, जव्हार ,मोखाडा तालुक्याचा दौरा दिनांक १७- १२- २०२३ या दिवशी करणार असून तालुका अध्यक्ष यांची भेट घेऊन पक्ष वाढीबाबत तालुका कमिटी कशी असावी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष पदाधिकारी यांच्या भेटीकरिता सदर दौरा असून पालघर जिल्हा जिल्ह्यातील पक्ष वाढी बाबत काय उपाययोजना कराव्या, जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत पक्षप्रमुख आदरणीय महेश भाई वसावा साहेब यांच्या आशीर्वादाने पालघर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त केल्या नंतर आप संजय घाटाळ साहेब यांचा पहिला यांचा पहिला दौरा असून ही आपली सामाजिक बांधिलकी आणि पक्ष वाढीसाठी योग्य असा हा महत्त्वाचा दौरा मानला जात आहे असे नमूद जिल्हा संघटक मोहन गुहे यांनी केले आहे.