ji24news

ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू ग्रामपंचायत ची कामे ठप्प…

ग्रामसेवकांचे काम बंद आंदोलन सुरू ग्रामपंचायत ची कामे ठप्प…
सरपंच, उपसरपंचांचाही पाठिंबा

प्रतिनिधी ji24news-दीपक भोये…

विक्रमगड
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केल्या जात असलेल्या मागण्यांबाबत सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील सर्व ग्रामसेवकांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन २० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व ३७२ ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी आहेत. या आंदोलनाला सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांना स्वतंत्र विकास निधी देण्यात यावा, सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, शिक्षक, पदवीधर आमदारांच्या धर्तीवर महाराष्ट्रात सहा विभागांत सहा सरपंच आमदार करावेत, मुंबईत सरपंच भवन बांधावे, रोजगार सेवकांना नियमित प्रति महिना १५००० मानधन देण्यात यावे आदी मागण्या या काम बंद आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ग्रामसेवकसह ग्रामपंचायत संबंधित सर्व कर्मचारी, पदाधिकारी काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर