ji24news

बोईसर ; बोईसर येथील वाणगाव येथे राहणारा महाठग तोतया पोलिसास बोईसर क्राईम बॅचने मुसक्या आवळल्या .

बोईसर ;पोलिसांत नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक आदिवासी तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या किशोर कुडू या भामटय़ास बोईसार  पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.
             वाणगाव कंसारा पाडा येथे गेली पाच वर्षे भाडय़ाने खोली घेऊन राहणारा किशोर कुडू हा स्वत: पोलीस असल्याची बतावणी करत असे.  तक्रारी आल्याने तोतया पोलिसाला पोलिसांनी अटक केली असून .

           आपल्या चारचाकीच्या पुढे पोलीस नावाची पाटी आणि पोलीस टोपी ठेवून वावरत असलेल्या या भामटय़ाने अनेक बेरोजगार तरुणांना पोलिसांत भरती करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यापोटी त्यांच्याकडून तो पैसेही घेत असते. अशा दहा ते बारा आदिवासी तरुणांना फसवत त्याने लाखो रुपये उकळले आहेत. त्याचप्रमाणे आपण पोलीस आहोत, बतावणी करून असे सांगत. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्रीच्या नावाखाली किराणा दुकानदारांकडूनही त्याने लाखो रुपये घेतले होते. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरती आपल्या बनावट पोलीस सहकाऱ्यांमार्फत दमण आणि दादरा नगर हवेली येथे बनावटी दारू तस्करी करणाऱ्यांचा त्याने माग काढला होता. शिवाय त्यांच्याकडून पोलीसच असल्याच्या थाटात वसुलीही केली होती.
वाणगाव कंसारा पाडय़ात त्याने पोलीस म्हणून दहशत निर्माण केली होती. पालघर पोलिसांकडे या तोतया पोलिसाविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहेत. त्याने आजवर नक्की किती जणांना फसवले होते ते चौकशीत समोर येईल. 

            दरम्यान बोईसर क्राईम बॅचने मुसक्या आवळल्या असून, पोलिस कसून तपास करीत आहेत . 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर