
साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन…
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वर्धा : साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, जिल्हा वर्धा येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी, कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा. मारोती ठोंबरे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. विठ्ठल घिनमिने, डॉ. प्रवीण कारंजकर, डॉ. संजय दिवेकर यांची उपस्थिती होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ग्राहक दिनाचे महत्त्व समजून सांगितले. त्यांनी सांगितले की, ग्राहक ही प्रत्येक व्यवसायाची मूलभूत संपत्ती आहे. ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणे हे व्यवसायाचे प्राथमिक कर्तव्य आहे. ग्राहकांच्या सन्मानाने वागणे आणि त्यांना चांगले सेवा देणे हे प्रत्येक व्यवसायिकाने केले पाहिजे.
यावेळी प्रा. मारुती ठोंबरे यांनी ग्राहक सेवा म्हणजे काय आणि ग्राहक सेवा कशी दिली पाहिजे यावर व्याख्यान दिले. त्यांनी सांगितले की, ग्राहक सेवा ही एक कला आहे. ग्राहकांच्या भावना समजून घेणे आणि त्यानुसार त्यांच्या गरजा पूर्ण करणे हे ग्राहक सेवा देण्याचे तंत्र आहे.
डॉ.सारिका चौधरी यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि त्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ग्राहकांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा करण्यात आला आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती असणे आणि त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.विठ्ठल घिनमिने यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक सेवा क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.ग्राहक सेवा क्षेत्र हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Total Users : 10829