ji24news

पालघर: डहाणू तालुक्यातील किमान २५ ते ३० एकर क्षेत्रफळावर रानडुकरांनी केले शेतकऱ्यांचे नुकसान.

पालघर: डहाणू तालुक्यातील किमान २५ ते ३० एकर क्षेत्रफळावर रानडुकरांनी नुकसान केले आहे. परंतु त्या बाधित शेतकऱ्यांना आजवर नुकसानभरपाई मिळालेली नाही. कृषी विभागाकडे अशा प्रकारचे अर्थसाहाय्य करण्याची तरतूद नाही, असे सांगण्यात येते.

     तर वन विभागाकडून मिळणारी मदत फारच तुटपुंजी आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचणी, ताणीशी, चिंचणी, देदाळेपासून थेट वाणगावपर्यंतच्या क्षेत्रात फेब्रुवारीच्या मध्यावर रानडुकरांच्या कळपाने हल्ला केला. शेतातील मिरची, अळू, केळी, कांदे, नारळ आणि इतर भाजीपाला याचे नुकसान केले. डुकरांनी अनेक ठिकाणी झाडांची मुळे खणून काढली तसेच शेणखताचे नुकसान केले. या नासधुसीमुळे शेतकऱ्यांचे दर एकरास ५० हजारांचे नुकसान झाल्याचे, त्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात काही बाधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे मदतीसाठी अर्ज केले होते. त्यावेळी रानडुक्करांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यास कृषी विभागाकडे कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात आले. तर वन विभागाकडून भाजीपाला लागवड नुकसानीसाठी तुटपुंजी मदत मिळते. शिवाय त्याच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करून घेणे आवश्यक असते.
पालघर व डहाणू तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून रानडुकरांचा त्रास वाढला आहे. पण वन विभाग त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाही. रानडुक्कर संरक्षित प्राणी असल्याने त्याची शिकार करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे शेतकरी रानडुक्कर मारू शकत नाहीत. रानडुकरांची प्रचंड पैदास झाल्यानेच हा त्रास होत आहे. त्यामुळे तळ कोकणांत आणि राज्याच्या इतर भागांत रानडुकरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ज्या उपाययोजना केल्या आहेत, तशाच पालघर जिल्ह्यातही राबवाव्या, यासाठी वन विभागाने  व कृषि विभागाने प्रयत्न करावेत, असे स्थानिक  शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर