ji24news

श्री गणेश विद्यामंदिर दातिवली शाळेची शैक्षणीक सहल मुंबई दर्शनला रवाना ..

श्री गणेश विद्यामंदिर दातिवली शाळेची शैक्षणीक सहल मुंबई दर्शनला रवाना –


दिवा – ji24news(सचिन शेलवले )

दिनांक 29/12/2023 रोजी श्री गणेश विद्या मंदिर दातिवली दिवा पूर्व या शाळेची शैक्षणिक सहल इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत तसेच माय मदर इंग्लीश स्कुलचे विद्यार्थी असे एकुण ५०० विद्यार्थ्याची व त्यांच्या समवेत शिक्षकांची सकाळी शाळेतून ठिक 7.00 वाजता मुंबई दर्शन करण्यासाठी निघाली . प्रथम संस्थेचे सचिव श्री साईनाथ म्हात्रे व केतकी म्हात्रे यांच्या हस्ते पुजन व त्रीफळ वाढविला . सर्व मुलांनी बसमध्ये गाण्याच्या भेंड्या , गाण्यांवर नाच करत बसेसमध्ये दंगा केला .मुंबई दर्शनामध्ये प्रमुख नेहरु तारांगण, नेहरु सेंटर व राणीचा बाग ही प्रमुख ठिकाणे होती . मुंबईला गेल्यावर मुलांना प्रथम नास्टा दिला त्यानंतर नेहरु तारांगण चा शो दाखविला . तेथे मुलांना ग्रह, तारे, उपग्रह यांची प्रत्यक्ष माहिती अनुभवाला मिळाली . त्यानंतर मुलांनी दुपारचे जेवण करून नेहरु सेंटर बघितले . तिथे अनेक वैज्ञानिक शोध, गणिती तंत्र , विविध ध्वनी निर्माण करणारी यंत्र , अनेक गणिती खेळ प्रत्यक्ष मुलांना अनुभवायला मिळाली . त्यानेतर राणीच्या बागेत मुलांना प्रत्यक्ष हत्ती, वाघ, सिंह, अस्वल, तरस, मगर, कासव, पोपट, पेंग्विन असे अनेक प्राणी व पक्षी प्रत्यक्ष अनुभवास मिळाले . तसेच मुलांनी त्या बागेत विविध खेळांचा आनंद घेतला . सर्व विद्यार्थी असे प्रेक्षणीय स्थळे पाहुन उत्साहीत व आनंदित होती . मुंबई दर्शनासाठी यावर्षी शाळेतून दहा लक्झरी बसेस होत्या . पालकांचे विद्यार्थ्यांना सहलीला पाठवण्याचे प्रोत्साहन मिळाले होते . संध्याकाळी मुलांना नास्ता मिळाला . सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहुन सर्व बसेस दिव्याच्या रस्त्याने रवाना झाल्या . सर्व विद्यार्थी सुखरूप घरे पोहोचली .सर्व पालकांनी शाळेचे ,सहल कमिटीचे ववस्थापक व शिक्षकाचे आभार मानले . दिवसभरातील सुंदर नियोजन शाळेच व्यवस्थापन कमीटीने केले होते . यावर्षीची सहल खुप मजेदार व स्मरणात राहील असे यातुन दिसुन येते आहे .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर