
अंबोली जव्हार फाटा येथे रस्ता रोको आंदोलन……
प्रतिनिधी – जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी त्रंबकेश्वर तालुक्यातील वेळूंजे ते खरवळ, हेदुलीपाडा नांदगाव कोहळी, खरवळ असा हरसुल जोड रस्ता असून त्या रस्त्याची बिकट अवस्था असून रस्ता मंजूर असून सुद्धा याकडे शासन लक्ष देत नाही यासाठी 12 गावांपैकी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच अथवा सदस्य हे कुणीही पाठ पुरावा करण्यास तयार होत नसून अखेर नासिक जिल्हा युवा अध्यक्ष श्री जयवंत भाऊ हागोटे व तालुकाध्यक्ष अंकुश मौळे सामाजिक कार्यकर्ते श्री बुधा भाऊ ढोरे उत्तम लिलके नवनाथ बदाने तसेच परिसरातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांनी मिळून रास्ता रोको करून जोपर्यंत निवेदन स्वीकारण्यासाठी जो पर्यंत कोणीही अधिकारी वर्ग किंवा वरील प्रश्न मार्गी लावत नाहीत तोपर्यंत रस्ता रोको मोर्चा आंदोलन करण्यात आले होते अवघ्या एक ते दीड तासानंतर P.M.G.S.Y. अधिकारी व P . W .D. चे अधिकारी व जिल्हा परिषद चे अधिकारी येऊन त्यांनी निवेदन स्वीकारले व अवघ्या दीड तासा पर्यंत रास्ता रोको आंदोलन हे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री लकी भाऊ जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी मोर्चानंतर वाहतूक कोंडी मोकळी करून मोर्चा सहभागी होऊन मोर्चा आंदोलन शांत पार पाडले
Total Users : 10829