ज्ञानमाता सावित्रीमाई फुले यांची 193 वी जयंती सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये साजरी..
ज्ञानमाता सावित्रीमाई फुले यांची 193 वी जयंती सरळगाव विभाग हायस्कूलमध्ये साजरी शहापुर – ( सचिन शेलवले ) पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी संचालित *सरळगांव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दुपार सत्रात स्त्रीशिक्षणाच्या आद्यप्रवर्तक, समाजसेविका,पहिल्या शिक्षका , मुख्याध्यापिका ,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद व सहभाग चांगला होता . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक . डी. एम. पंडित सर यांनी भूषविले . तदनंतर सावित्रीबाई फुले व शिक्षणमहर्षी पद्मश्रीअण्णासाहेब जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तदनंतर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण . जे एल बोरसे सर यांनी केले शिक्षक मनोगतात. दळवी ए. डी. मॅडम यांनी सावित्रीमाईच्या गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर दुपारसत्र प्रमुख . संजय इधे सर यांनी आपल्या एकजूट काव्य संग्रहातील ज्ञानमाता कविता सादर करत सावित्रीमाईच्या कार्यावर प्रकाश टाकला,अध्यक्षीय मनोगतातून मा. पंडित सरांनी सावित्रीमाई फुलेंच्या काव्यसंग्रहातील कविता सादर करत आपल्या मनोगत मांडले यावेळी सावित्रीमाई फुले यांच्या वेशभूषेत कु. वेदिका हलपतराव, रागिणी खिल्लारे, सलोनी भोईर यांनी भूमिका साकारली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शशिकला इधे मॅडम यांनी केले शेवटी . बोरसे सरांनी उपस्थितांचे आभार , वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने केली.