ji24news

शहापूर तालुक्यातील नेवरे गावातील ह .भ.प वै . नथुराम नवसू शेलवले यांचे २० वे पुण्यस्मरण…

शहापूर तालुक्यातील नेवरे गावातील ह .भ.प वै . नथुराम नवसू शेलवले यांचे २० वे पुण्यस्मरण.

शहापूर – नेवरे (सचिन शेलवले ) गुरुवार दिनांक 4/1/2024 रोजी ह .भ.प . वै . नथुराम नवसू शेलवले यांचे २० वे पुण्यस्मरण निमित्त त्यांची पत्नी संगिता नथू शेलवले तिची तिन्ही मुले संदिप शेलवले, सचिन शेलवले , एकनाथ शेलवले व त्यांच्या पत्नी व त्यांची मुले दरवर्षी एकत्र येऊन गुण्या गोविंदाने दरवर्षी वर्षश्राद्ध कार्यक्रम करतात . या वर्षी २० वे पुण्यस्मरण असून सकाळी फोटोचे पूजन करून नैवेद्य दाखवून संध्याकाळी 5 वाजता पंचक्रोशीतले वारकरी, मित्र परिवार मंडळ , बाल वारकरी, महिला मंडळ व गावकरी सर्वांनी एकत्र येऊन भजन केले . दरवर्षी पंचक्रोशीतले लोकांचा सहभाग, सहकार्य असते त्यामुळे हा कार्यक्रम पार पडला जातो . ह .भ.प .वै . नथु बाबा सगळे या नावानेच त्यांना हाक मारत . त्यांना लहान पणापासून अध्यात्माची आवड होती . जुनी मॅट्रीक पास होते . इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलायचे . नोकरी न करता शेती कडे लक्ष दिले . ते देवांची नित्य नियमाने पुजा करीत असत . त्यांचा स्वभाव प्रेमळ , अत्यंत हुशार , अध्यात्मिक आणि भोळा, उदार मताचे होते . त्यांनी स्वत पेटीवादक, तबला वादक, चित्र हस्तकला, मधुर गायन त्यांच्या गायनात गोडवा होता .त्यामुळे पंचक्रोशीतले किर्तनकार त्यांच्या घरी येऊन त्यांना गायनासाठी घेऊन जात असत . अवतीभोवती आलेल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला घरी आणून चहा पाजत असत . त्याशिवाय ते पुढे पाठवित नसत . शेवटपर्यंत माणुसकीचा धर्म निभावलला . गावातील सर्व लोकांना एकत्र आणून मंदिराची स्थापना केली . सप्ताहाची सुरुवात केली . अनेकांना पेटी शिकविली, गायन करायला शिकविले . त्यांच्या प्रेमळ, नम्र, शांत स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली होती . पंचक्रोशीत कुठलाही कार्यक्रम असेल किंवा सुख दुखात स्वःत जातीने हजर राहायचे . सकाळी शेती संध्याकाळी हरिनाम संकीर्तन अशाप्रकारे ते आपला प्रपंच चालवित असत . त्यांच्या त्यामुळे त्यांचे समाजात नाव होते . तिन्ही मुले शिकविली . गरीब परिस्थिती असताना सुद्धा कुठलाही रोजगार नसताना शेतीकरून त्यांना चांगले शिक्षण दिले . आज तिन्ही मुले चांगल्या नोकरीला आहेत . परमार्थिक आहेत . त्यांचे मामा , मावशी यांचे कुळ सुद्धा परमार्थिक आहेत . त्यांच्या अगोदरच्या पिढ्या सुद्धा परमार्थिक होते . म्हणून ते लहान पणापासुन च अध्यात्मिक होते . भगवंताची आवड होती . त्यासाठी ते दरवर्षी नचूकता पंढरपुरची वारी व त्र्यंबकेश्वरची वारी करायचे . संध्याकाळी ठिक 7.00 ते 9.00 वाजेपर्यंत विलास महाराज भावार्थे यांनी हभप वै . नथु बाबा यांच्या २० व्या पुण्यस्मरणा निमित्त जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा ॥ १ ॥ असा तीन चरणाचा अभंग यावर कीर्तनरूपी प्रबोधन करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले . थोडक्यात भावार्थ सरलार्थ साध्यासोप्या भाषेत स्पष्ट करून अनेक दृष्टांत देऊन अनेक अभंगाचे दाखले देऊन गायन करून अभंग सोडविला . वडिलांची किर्ती अशी असावी कि त्यांनी केलेल्या संस्कारामुळे त्याच्या पोटी जन्माला आलेली मुलांनी बापाचे नाव रोशन करावे . हरीनाम सतत उच्चारल्याने वाट्याला आलेला पापाचे छालन होऊन पूण्य पदरी पडुन त्याचा आत्मा मोक्षास जावा . नुसती माणसाची ओळख नकरता प्रथम प्रत्येक व्यक्तीने आत्म्याची ओळख करून घ्यावी .असे किर्तनातून महाराजांनी प्रबोधन केले . त्यानंतर महाप्रसाद झाला . असे कार्य दरवर्षी आई ,मुले , त्यांच्या सुना त्यांची मुले, नातेवाईक , सगेसोयरे, मित्र परिवार , गावकरी तसेच पंचक्रोशी तील सर्व समाज त्या दिवशी एकत्र येऊन त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून गुण्यागोविंदाने भजन किर्तन हरिनामाचा जप करीत असतात .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर