प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आयुष्यमान कार्ड व आधारकार्ड नोंदणी शिबिराचे खोस्ते येथे आधार शिबिर संपन्न..
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आयुष्यमान कार्ड व आधारकार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन: खोस्ते येथे आधार नोंदणी शिबिर संपन्न…
प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील ग्रामपंचायत खोस्ते येथे आदीम जमाती कातकरी समाज साठी आधार कार्ड अद्ययावत, नवीन आधार कार्ड काढण्यासाठी ,जव्हार प्रकल्प अंतर्गत व विक्रमगड तहसील कार्यालयात अंतर्गत आधार नोंदणी व आयुष्यमान कार्ड शिबिर आयोजित केले होते. अनेक नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध, शेतकरी यांच्या आधार कार्डात त्रुटी असल्याने यांनी विशेष आधार कार्ड नोंदणी व जातीचा दाखला,रक्त तपासणी, आयुष्यमान कार्ड उत्पन्नाचा दाखला इतर भव्य विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन केले. शासकीय अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक संजय वाघ साहेब सरपंच नीलम भास्कर भोये ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भोये ग्रामपंचायत चे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभेल. ग्रामपंचायत हद्दीतील मोठ्या संख्येने विद्यार्थी महिला व या शिबिराचा लाभ घेतला.