ji24news

पालघर जिल्हा सबज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप – 2022 स्पर्धेत कु.तनुश्री विष्णु गाडर हिची सुवर्ण पदकाची हॅट्रिक

पालघर जिल्हा सबज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप – 2022 स्पर्धेत कु.तनुश्री विष्णु गाडर हिची सुवर्ण पदकाची हॅट्रिक.

पालघर .प्रतिनिधि  रामदास गाडर :- मोखाडा – महाराष्ट्र राज्य व पालघर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पालघर जिल्हा सबज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप सन – 2022 .दि. 09/04/2022 व 10/04/2022 रोजी विरार येथील अमेया क्लासिक क्लब मैदानात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धावणे, रिले, लांबउडी आणि गोळाफेक या मैदानी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातून जवळपास 250 खेळाडू सहभागी झालेले होते. यामध्ये कु.तनुश्री विष्णु गाडर ( वय – 9 वर्षे ) मु.घानवळ ता.मोखाडा जि.पालघर हिने मोखाडा तालुक्याचे प्रतिनिधीत्व करताना 10 वर्षे वयोगटात 100 मिटर्स धावणे, 50 मिटर्स धावणे व लांबउडी या तीनही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाची हॅट्रिक मिळवून मोखाडा तालुका व पर्यायाने पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
तनुश्री ही पालघर येथे राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू सौ.स्नेहल रजपूत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिक्सचे धडे गिरवत आहे. राजपूत मॅडमचे मार्गदर्शन, सराव आणि तनुश्रीच्या आई – वडिलांचे योगदान व पाठिंबा यांच्या जोरावर तनुश्रीने ही सुवर्ण पदकाची हॅट्रिक नोंदवली आहे.ती  twinkle  strar english  school टिंकल स्कूल  पालघर या शाळेत शिकत असून .
या मैदानी क्रीडा प्रकारातील सुवर्ण हॅट्रिकमुळे तनुश्री गाडर हीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.  

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर