
गर्भवतीसह बाळाचा मृत्यू झालेल्या पिडीत कुटुंबाला डॉ.हेमंत सवरा यांची सांत्वनपर भेट..
जोहार इंडिया न्यूज 24.
मोखाडा तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी येथील गर्भवती महिला रूपाली भाऊ रोज (वय 25) हिला मोखाडा ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते ; मात्र तिच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्यामुळे तिला नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवले होते. जिल्हा रुग्णालय नाशिक येथे तीन – चार दिवस उपचार केल्यानंतर या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या सांत्वन्नपर भेटीत पिडीत कुटुंबीयांना अन्नधान्याचे किट देऊन मानसिक आधार दिला. तसेच सदर घटनेची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी केली जाईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पिडीत कुटुंबीयांना आश्वासित केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात ग्रामीण भागामध्ये रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबर आपण संवाद साधणार आहोत असे प्रतिपादन डॉ. हेमंत सवरा यांनी केले आहे.
या भेटी प्रसंगी श्री.संतोष चोथे, विठ्ठल चोथे,मिलिंद झोले, उपसरपंच- उमेश येलमामे, हनुमान पादिर,प्रीतम काळे,दिशांत पाटील,भरत नडगे, ईश्वर गांगुर्डे,हरिश्चंद्र पाटील इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Total Users : 10829