जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोस्ते प्रजासत्ताक दिन संपन्न…..
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोस्ते प्रजासत्ताक दिन संपन्न……
प्रतिनिधी -दिपक भोये विक्रमगड
विक्रमगड तालुक्यातील खोस्ते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 जानेवारी 2024 रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात संपन्न करण्यात आला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश चालवण्यासाठी संविधानाची गरज असल्याने त्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान निर्माण करण्यात आले. संविधान अर्पण केल्यानंतर अंमलबजावणी ज्या दिवसापासून सुरू झाली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी हा दिवस लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेले राज्य अशी लोकशाहीची व्याख्या करण्यात आली. भारत देश चालवण्याचे इतके उदात्त धोरण निश्चित करणारा देश म्हणून भारत देशाचा उल्लेख करण्यात येतो. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वीरपुरुषांना आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले असून देश चालवण्यासाठी वेळ,पैसा,श्रम आणि संपत्ती चा त्याग करावा लागला ज्यामुळे जनतेच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्याकरता शक्य झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रभात फेरी काढत प्रजासत्ताक दिनाच्या घोषणा देत संपूर्ण गावात प्रभात फेरी मारत शाळेतील भागापर्यंत फेरी पूर्ण करत आपल्या तिरंगा फडकावला. राष्ट्रगीताने व तिरंगेला सलामी देत प्रजासत्ताक दिन आयोजित करण्यात आला. खोस्ते येथील शालेय विद्यार्थ्यांनी वेशभूषा मध्ये सांस्कृतिक, गीतगायण,भाषणे अतिशय उत्कृष्ट आणि मनोरंजक पद्धतीने कार्यक्रम साजरा केला. यावेळी उपस्थित अंगणवाडी, सेविका ,मदतनीस, शालेय विद्यार्थ्यी, पालक, माता व शिक्षक ग्रामपंचायत सदस्य तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन अतिशय सुंदर व आनंदात संपन्न करण्यात आला.