
रोलर ऍथलेटिक्स नॅशनल चॅम्पियनशीप – 2023-24 मध्ये गाडर भगिनींचे सुयश…
जोहार इंडिया 24 न्यूज मोखाडा
दि.11 फेब्रुवारी रोजी खोपोली येथे रोलर ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व स्कुल गेम फेडरेशन आयोजित रोलर ऍथलेटिक्स नॅशनल चॅम्पियनशीप – 2023-24 आयोजित करण्यात आली होती. या चॅम्पियनशिपमध्ये कु. दक्षतनया रामदास गाडर हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना 14 वर्षे वयोगटात स्केटिंगच्या लॉंग रेसमध्ये – सिल्वर मेडल व शॉर्ट रेस ब्रॉन्झ मेडल पटकावला आहे. तर कुमारी उत्कर्षा रामदास गाडर लहान 11 वर्षे वयोगटात शॉर्ट व लॉन्ग रेसमध्ये ब्रॉन्झ मेडल्स पटकावले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग खेळातील गाडर भगिनींनी मिळवलेल्या सुयशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गाडर भगिनी सध्या सागर स्केटिंग अकॅडमी – टिटवाळा येथे कुलदीप सागर सरांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचे धडे गिरवत आहेत.
Total Users : 10829