
महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर मैदानी अजिंक्य स्पर्धा -2023- 24 मध्ये तनुश्री गाडर हिने पटकावले सुवर्ण व रौप्य पदक
जोहार इंडिया 24 न्यूज पालघर प्रतिनिधी
सांगली – दि.11 फेब्रुवारी, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने, सांगली जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन व सांगली शहर अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच महाराष्ट्र राज्य सब जुनिअर मैदानी अजिंक्य स्पर्धा 2023 24 सांगली येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत पालघर येथील कुमारी तनुश्री विष्णू गाडर हिने हिने 12 वर्षे वयोगटात पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना लांब उडीमध्ये 3.35 मिटर इतकी लांब उडी मारून सुवर्णपदकाला गवसणी घातली तर 300 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. तनुश्रीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे तिच्यावर पालघर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तनुश्री ही सध्या ॲथलेटिक्स पालघर ग्रुपमध्ये स्नेहल राजपूत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत ॲथलेटिक्स धडे गिरवत आहे.
Total Users : 10829