
विक्रमगड पोलिसांची जनजागृती व साक्षरतेसाठी जनसंवाद.... प्रतिनिधी - ji24news दीपक भोये. विक्रमगड पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील दादडे येथे विक्रमगड पोलीस स्टेशन माध्यमातून जनसंवाद अभियान कार्यक्रम झाला. बालविवाह, अपघात, साक्षरता, या विषयावर विक्रमगड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे साहेब यांनी मार्गदर्शन केले. बालविवाह प्रतिबंध लावण्यासाठी जनजागृती पालकांमध्ये करण्यात आली. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम व अटी पाळाव्यात असे आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश कडव मेजर, रोजगार सेवक लवेश कासट, जिल्हा परिषद शाळा दादडे शालेय समितीचे अध्यक्ष अजय कासट, प्रवीण भावर , काशीराम कासट, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Total Users : 10829