
उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाचा पथनाट्याद्वारे जाणीव जागृती कार्यक्रम.... प्रा.दिनेश राठोड (ji24news)जिल्हा प्रतिनिधी -वर्धा वर्धा जिल्ह्यातीलहिंगणघाट तालुक्यातील आजनसरा या गावांमध्ये स्पेक्ट्रम कॉटफायबर एल. एल. पी. अंतर्गत दिनांक १२/०२/२०२४ ला सायंकाळी उत्तम कापूस निर्मिती उपक्रम व मैत्री साधना फाउंडेशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्य आयोजित केले. या पथनाट्यद्वारे सर्व शेतकऱ्यांना शत्रू कीड व मित्र कीड यांची ओळख करून दिली. हानिकारक कीटकनाशकाचा वापर कमी करणे, कीड दिसताच फवारणी न करणे, पिकाची पाहणी करूनच फवारणी करणे, वैयक्तिक सुरक्षात्मक साधनांचा वापर करणे, ठिंबक सिंचन, एक सरीआड पद्धतीचा अवलंब करून पाण्याचे व्यवस्थापन करणे, जैवविविधतेचे महत्व , बालमजुरी होऊ देऊ नये, समान काम समान वेतन, मिनीमम वेज, वय, लिंग, जात, धर्म, अशा गोष्टींवर भेदभाव न करून आपण सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे असा संदेश लोकांपुढे मांडत सहयोगी कलावंत ग्रुपचे डॉ. रामेश्वर व्हेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक रा. वसाके, प्रतीक प्र. वाटकर, हर्षदा शा. वसाके, तेजस ग. मोहुर्ले, ईश्वरी वी. येंडळे, गणेश दि. भोंडवे यांनी पथनाट्य सादर केले. प्रोजेक्ट कोऑरडीनेटर मोहन बरडे व पियु व्यवस्थापक रेणुका फरकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्ड फॅसिलिटर राहुल कहुरके पंकज दोडके स्नेहल ढाले वैभव पोहणकर दिगाबर शेलकर यांनी हा कार्यक्रम केला प्रेक्षक म्हणून गावातील सर्व लोकांची, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्तिथी होती.
Total Users : 10829