
महाशीर माझे मित्र-तिळसे व लहान मुलांचे सामाजिक उपक्रम व स्वच्छता मोहीम........ प्रतिनिधी -दिपक भोये विक्रमगड पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वैतरणा नदी प्रवाहात तिळसे येथे असणारे महाशीर मासे प्रजाती अतिशय दुर्मिळ आहे. या माश्यांच्या आधिवासाचा व इथल्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करून त्या कशा सोडवता येतील यासाठी परिसरातील पहीली ते आठवीच्या सव्वीस मुलांनी एकत्र येऊन येथे अभ्यासाची सुरुवात केली . जुन २०२३ महिन्यापासून सुत्रबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. दर शुक्रवारी तिळसे येथे एकत्र येतात मासे कुंड परिसर स्वच्छता केली जाते. माशांच्या अधिवासाचा शास्त्रीय अभ्यास करावा म्हणून तिथे असलेल्या जैविक विविधतेच्या नोंदी घेतात. जंगलातील वाघांचं महत्व जितकं आहे तितकंच महत्त्व या माशांना गोड्या पाण्यातील परिसंस्थेत आहे.वाघांच्या रक्षणार्थ आज अनेक प्रकल्प राबवले जातात. तिळसे येथील हे मासे व त्यांच्या संवर्धनासाठी फार प्रयत्न झालेले दिसत नाहीत. आजवर परिसरातील लोकांनी यांचं जतन देवाचे मासे म्हणून केले आहे. मासे कुंडातील अस्वच्छता व इतर कारणांमुळे शेकडो मासे काही वर्षांपूर्वी मरून गेले होते. नव्या पीढीने आता माशांना वाचवण्या साठी पुढाकार घेतला पाहिजे.आज या परिसरात मोठ्या पर्यटक रोज मासे बघायला हजेरी लावतात. श्रध्दा म्हणून या माशांना खायला अनेक पाकीट बंद खाद्य पदार्थ घालतात कधीकधी बटर ,लाह्या, चपाती ,खिचडी, पोहे यांसारखे अन्न पदार्थ घालतात. अनेकदा हे पदार्थ पाण्यात तसेच साठून कुजतात. माशांच्या अन्न खाण्याच्या सवयी माणसांच्या अशा वागण्याने बदलत असून त्यांच्या जीविताला याचा नक्की धोका आहे. आपण सुज्ञपणे या परिसरात स्वच्छता ठेवली पाहिजे. माशांना अन्न पदार्थ खायला घालू नये. नाहीतर गोड्या पाण्यातील ह्या रुबाबदार सजीवाला येत्या काळात चित्रात बघायची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहाणार नाही. महाशीर मित्र (फ्रेंड्स ऑफ महाशीर) या नावाने मुलांनी आता हे अभियान सुरू ठेवण्याचा संकल्प या मुलांनी केला आहे.
Total Users : 10829