
श्रमजीवी संघटनेचे वतीने ग्रामपंचायत मध्ये लोकवर्गणी.....
प्रतिनिधी दीपक भोये ;ji24newsविक्रमगड
.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील पाणी टंचाईसह मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी गेले अनेक दिवस गावागावात जाऊन जनजागृती करण्याचं काम श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते करत होते. यानंतर १ एप्रिल ते १० एप्रिलपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संघटनेनं पाण्याच्या प्रश्नावर एक चळवळ सुरू केली आहे. या हंडा मोर्चाचं नेतृत्व त्या-त्या भागातील श्रमजीवी संघटनेचे गाव विभाग स्तरावरील गाव कमिटी तसंच झोन कमिटीच्या प्रमुखांनी केलं आहे. तर पदाधिकाऱ्यांनी मोर्चांना भेटी देऊन लढवय्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. या मोर्चामुळं पाणी पुरवठा प्रशासन पार हादरून गेलं आहे. यापुढं अंदाजपत्रकाप्रमाणं आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणं काम होतं की, नाही यावर श्रमजीवीचे प्रशिक्षित कार्यकर्ते तसंच नागरिकांचं लक्ष असणार यात मात्र शंका नाही. दिनांक 29/04/2024 रोजी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विक्रमगड तालुकयात सर्व ग्रामपंचायतींना जलजीवन मिशन पाणी योजनेची साखरे ,आलोंडे, इतर ग्रामपंचायत मध्ये लोकवर्गणी भरण्यात आली.
या सर्व ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विजय भाऊ जाधव यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना भेटी दिल्या तसेच सोबत पालघर जिल्हा उपाध्यक्ष तुषार भाऊ सांबरे, व सर्व तालुका टीम, संघटनेचे कार्यकर्ते महिला वर्ग या ठीकानी उपस्थित होते.
Total Users : 10829