ji24news

कृषि विभाग रा. कृ. वि. योजनेअंतर्गत मृद आरोग्य पत्रिका व सुपिकता कार्यक्रम माडाचापडा येथे राबवण्यात आला.

  • कृषि विभाग रा. कृ. वि. योजनेअंतर्गत मृद आरोग्य पत्रिका व सुपिकता कार्यक्रम माडाचापडा येथे राबवण्यात आला.
  • विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
  • विक्रमगड – विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कऱ्हे तलावली हद्दीतील महसूल गाव माडाचापडा येथे कृषि विभाग रा. कृ. वि. योजनेतंर्गत मृद आरोग्य पत्रिका व सुपीकता कार्यक्रम राबवून आणि कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
  • या ठिकाणी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री. रामदास फरारा साहेब यांनी प्रत्येक्षात जावून माडाचापडा या गावातील ग्रामस्थांना “शाश्वत व किफायतशीर शेतकरी मूलाधार माती, पाणी परीक्षणाने करूया साकार”.
  • पीक उत्पादनामध्ये सहभागी असणाऱ्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्वाचा नैसर्गिक घटक आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादनवाढसाठी उपयुक्त ठरतात. तथापि, अलीकडील कालावधीत मात्र शेती व्यवसायातून महत्तम उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर इत्यादींमुळे जमिनींचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. यामुळे पिकाची खुंटलेली वाढ, उत्पादनाचे गुणांमध्ये घट, जमिनी नापीक होणे, समस्याग्रस्त क्षेत्रामध्ये वाढ, उत्पादन क्षतेमध्ये घट आदी बाबी निदर्शनास येत आहे.
  • आजमितीस व्यापारी तत्त्वावरील शेती करणे अपरिहार्य आहे. यासाठी शेती नियोजनामध्ये जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मृद व पाणी परिक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे शेत जमिनीचा प्रकार, तिचे भौतिक, रासायनिक, कायिक, गुणधर्म अन्नद्रव्याची उपलब्धता या नुसार जमिनीमध्ये हवा, पाणी यातील समतोल राखणे, क्षारता, चोपण, घट्टपणा इत्यादी दोष दूर करणे, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य तसेच पिकास आवश्यक अन्नद्रव्य मात्रा या आधारे आवश्यक खत मात्रांचा अवलंब करणे शक्य होते. म्हणूनच जमिनीच्या आरोग्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे आणि तिचे आरोग्य शाश्वत स्वरूपात जतन करण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
  • यामध्ये जमिनीची उत्पादकता ही सोळा अन्नघटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. आणि या पिकासाठी लागणारे सोळा अन्नघटक पुढीलप्रमाणे आहेत.
  • अ) मुख्य अन्नघटक : १) हायड्रोजन (H2), २) ऑक्सिजन (O2), ३) कार्बन (C), ४) नत्र (N), ५) स्फुरद (P2O5), ६) पालाश (K2O)
  • ब) दुय्यम अन्नघटक : १) कॅल्शियम (Ca), २) मॅग्नेशियम (Mg), ३) गंधक (S)
  • क) सूक्ष्म अन्नघटक : १) लोह (Fe), २) मंगल (Mn), ३) तांबे (Cu), ४) जस्त (Zn), ५) मॉलिब्डेनम (Mo), ६) बोरॉन (B), ७) क्लोरीन (CL2)
  • मृद चाचणी प्रयोगशाळेत तपासण्यात येणारे गुणधर्म, मातीचा नमुना केव्हा व कोठे घ्यावा, मातीचे नमुने कसे घ्यावे, मृद नमुना कसा घ्यावा, अश्या विविध प्रकारे माहिती देऊन आणि मोलाचे योगदान देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर