ji24news

.मुंबई स्थित ग्रिन यात्रा ट्रस्ट तर्फे शाळा वसुरी बुद्रुक घोडमाळ विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जनजागृती सत्राचे आयोजन.

.मुंबई स्थित ग्रिन यात्रा ट्रस्ट तर्फे शाळा वसुरी बुद्रुक घोडमाळ विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जनजागृती सत्राचे आयोजन . वाडा – ( सचिन शेलवले ) मुंबई स्थित ग्रिन यात्रा ट्रस्ट तर्फे जिल्हा परीषद शाळा वसुरी बुद्रुक घोडमाळ तहसील वाडा जि. पालघर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने सत्राचे आयोजन करण्यात आले . या सत्रामध्ये ५० विदयार्थी आणि ४ शिक्षक सहभागी झाले होते . या सत्राचे संचालन ग्रीन यात्रा ट्रस्टच्या काजल गांगण यांनी केले . ज्यामध्ये माधवी भालेकर, पार्थ बागुल, प्रशांतराव अगले ग्रीनयात्रा यांची उपस्थिती होती . सत्रामध्ये विद्यार्थ्यांना हवामान बदल आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबददल माहिती देण्यात आली . तसेच त्यांना एकल वापराच्या प्लास्टीकच्या धोक्यांविषयी जागरुक करण्यात आले . ज्यामध्ये मायक्रो प्लास्टीक आपल्या अन्न आणि पाण्यातुन शरीरात जाऊ शकते आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो . हे समजावून सांगितले . सत्रा दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता . त्यांनी ही माहिती समजावून घेतली . आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपली आवड व्यक्त केली . सत्राच्या शेवटी ग्रीन यात्रा ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शाश्वत किट देण्यात आल्या . ज्यामध्ये स्टीलची बॉटल, स्टीलचा डब्बा, बांबूचा टूथब्रश आणि रोप लागवडीसाठी उपयुक्त पेन्सिल यांचा समावेश होता . कपड्यांच्या पिशव्यांचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना कपड्याच्या पिशव्याही देण्यात आल्या . शाळेच्या शिक्षकांनी या सत्रात सहकार्य केले . आणि हि काळाजी गरज आहे असे सांगितले . विद्यार्थ्यांमधे अशा प्रकारे जागरुकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले . याशिवाय विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन व ओला सुका कचरा वेगळा ठेवण्याचे महत्व याबदद्लही माहिती देण्यात आली .ग्रीनयात्रा टस्टतर्फे आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या सत्रांमुळे विद्यार्थ्यांमधे पर्यावरणाबदद्ल केवळ संवेदनशीलता वाढत नाही,तर ही स्वच्छ आणि टिकाऊ पर्यावरणाच्या दिशेने महत्वाची पायरी आहे .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर