ji24news

*मनोर – पालघर व जव्हार – मनोर या नाशिकच्या पार्श्वभूमीवर असलेल्या मार्गाच्या तातडीच्या विकासाची मागणी.

*मनोर – पालघर व जव्हार – मनोर या नाशिकच्या पार्श्वभूमीवर असलेल्या मार्गाच्या तातडीच्या विकासाची मागणी . *विक्रमगड प्रतिनीधी – प्रशांत दाव्हाड *विक्रमगड* / *पालघर* – अर्धकुंभ मेळा २०२७, नशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एन एच १६० ए ( मनोर – पालघर आणि जव्हार – मनोर) या महामार्गाच्या तातडीच्या विकासासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मार्गाच्या दुरुस्ती व विस्तारासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. अर्धकुंभ मेळा हा लाखो भक्त, पर्यटक आणि साधू – संताचे केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक सोहळा आहे. नाशिककडे जाणाऱ्या विविध मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पालघर जिल्ह्याच्या हे महामार्ग धार्मिक, व्यापारी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने त्याचा विकास अत्यावश्यक आहे. सद्या या महामार्गाची परिस्थिती अत्यंत खराब असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अपघाताचे प्रमाण अधिक वाढत असून नागरिकांना व वाहनचालकांना मोठया प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून याची दखल घेऊन खासदार डॉ. हेमंत सवरा साहेब यांनी या मार्गाच्या दुरुस्ती व चौपदरीकरण करण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर