
*वरणवाडी (टिपोणपाडा) येथे गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन . Bhojpuri प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड. तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कऱ्हे तलावली गाव वरणवाडी (टिपोणपाडा) येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणपतीचे नियोजन योग्य प्रकारे करण्यात आले होते. या गावातील सर्व ग्रामस्थ आवर्जून सहभागी होऊन गणपती उत्सवाला हजर होते. प्रत्येक नियोजन सुरळीतपणे पार पाडत कुठले ही गडबड न करता दर वर्षी प्रमाणे दीड दिवसांचा असून, डीजेच्या तालावर नाच काम झाले विसर्जनाच्या दिवशी पहिले लहान मुलांना संगीत खुर्ची खेळवण्यात आले. लहान मुलांनी त्याचा आनंद घेत मोठ्या उत्साहात खेळ केला या खेळामधून काही क्रमांक काढण्यात आले. प्रत्येकी क्रमांकास बक्षिसे देण्यात आले. त्यामुळे लहान मुलांनी या खेळाचा आनंद घेत आपले खेळ दाखवून दिले. या गणपतीबाप्पाचे नियोजक आपलं पालघर नेटवर्क न्यूचे उपसंपादक, तसेच माझं गावं माझं शहरं न्यूज पेपरचे विक्रमगड तालुका प्रतिनिधी प्रशांत दाव्हाड यांनी तसेच त्यांचे परिवार, गावातील भक्तांनी व ग्रामस्थानी योग्य पद्धतीने हात भार लावून दरवर्षी प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करून सर्वांनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम पार पडले. बाप्पाचे विसर्जन होत असताना बहुसंख्येने भक्तांनी दर्शन घेऊन उत्सवाची शोभा वाढवून विसर्जन करण्यात आले.
Total Users : 10828